IMPIMP

Devendra Fadnavis | पुणे जिल्हयातील 450 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी, 5000 युवकांना मिळणार रोजगार; फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis verbal attack on congress over calling pm narendra modi ravan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   वेदांता फॉक्सकॉननंतर (Vendetta Foxconn) टाटा एअरबसचा (Tata Airbus) मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीकांचा पाऊस पाडला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यामुळे या वादावर थोडा वेळ पडदा पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 450 कोटींची गुंतवणूक करणारा प्रकल्प महाराष्ट्रात आल्याचे ट्वीट केले आहे. (Electronics Manufacturing Cluster At Ranjangaon In Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळीत रांजणगाव (Ranjangaon) येथे हा प्रकल्प होणार आहे. या ठिकाणी प्रकल्पाला कंपनी आणि केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनित मॅन्युफॅक्टरींग क्लसटर्स (Electronic Manufacturing Cluster) असे या प्रकल्पाचे नाव आहे. ही कंपनी औद्योगिक, ग्राहक उपयोगी, सौर ऊर्जा उत्पादने आदी वस्तूंची निर्मिती करते.

 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हंटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मी त्यांते आभार मानतो. रांजनगाव येथे हा प्रकल्प 297.11 एकर जागेत पसरला आहे.
या प्रकल्पांतर्गत 492.85 कोटी रुपये प्रकल्प उभारणीवर खर्च झाले आहेत.
हा प्रकल्प भविष्यात रांजनगावात 2000 कोटींची गुंतवणूक आणि 5000 रोजगार निर्माण करण्याची क्षमता राखतो.
मी हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Aswini Vaishnav) आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajiv Chandrashekhar) यांचे आभार मानतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातून सतत एकामागे एक असे चार प्रकल्प बाहेर गेल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते.
त्यात सर्व प्रकल्प गुजरातला गेल्याने मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या विकासासाठी सत्तेवर आले आहेत का,
असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे हा एक प्रकल्प राज्यात आणून शिंदे-फडणवीस सरकारने थोडा वेळ
विरोधकांच्या तोंडावर पट्ट्या लावण्याचा प्रयत्न केला, असे म्हणण्यास हरकत नाही.

 

Web Title :- Devendra Fadnvais | electronics manufacturing cluster at ranjangaon in pune district says devendra fadnavis pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल

Supreme Court (SC) Bans Two Finger Test | बलात्कार पीडितेवर होणारी ‘टू फिंगर टेस्ट’वर घातली बंदी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

 

Related Posts