IMPIMP

Bank Holidays January 2023 | नवी वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या, जाणून घ्या किती दिवस राहणार बंद

by nagesh
Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays January 2023 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वर्ष २०२३ साठी बँक हॉलिडे लिस्ट (Bank Holidays List) प्रसिद्ध केली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये एकूण १४ दिवस बँकांना सुट्टी असेल (Bank Holidays January 2023). जानेवारीत चार रविवार आहेत. या दिवशी बँकेला साप्ताहिक सुट्टी असेल. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. एवढेच नाही तर काही सण आणि विशेष दिवसांमुळे वर्षाच्या पहिल्या महिन्यात काही दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेच्या शाखेत जाण्याचा तुमचा विचार असेल, तर आधी सुट्ट्यांची यादी तपासा. असे होऊ नये की ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाण्याचे ठरवले असेल त्या दिवशी बँक बंद असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशभरातील बँका जानेवारी २०२३ मध्ये १४ दिवस बंद राहणार नाहीत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत अनेक राष्ट्रीय सुट्ट्या आहेत, तर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक आहेत. केवळ संबंधित राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बँक शाखा बंद राहतात. त्यामुळे पंजाबमध्ये ज्या दिवशी बँका बंद होतील त्याच दिवशी महाराष्ट्रातील बँकांमध्येही कामकाज होणार नाही, असे नाही. (Bank Holidays January 2023)

 

जानेवारी २०२३ च्या सुट्ट्यांची यादी

१ जानेवारी २०२३ – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
२ जानेवारी २०२३ – मिझोरममध्ये नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे बँका बंद राहतील.
११ जानेवारी २०२३ – मिशनरी डे निमित्त मिझोराममध्ये सर्व बँका बंद राहतील.
१२ जानेवारी २०२३ – स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त, पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल.
१४ जानेवारी २०२३ – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
१५ जानेवारी २०२३ – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
१६ जानेवारी २०२३ – उझावर थिरुनाली निमित्त पॉंडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद राहतील, तर आंध्र प्रदेशमध्ये कानुमा पांडुगा निमित्त बँका बंद राहतील.
२२ जानेवारी २०२३ – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
२३ जानेवारी २०२३ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील.
२५ जानेवारी २०२३ – हिमाचल प्रदेशमध्ये राज्य दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.
२६ जानेवारी २०२३ – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
२८ जानेवारी २०२३ – महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असेल.
२९ जानेवारी २०२३ – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
३१ जानेवारी २०२३ – मी-दम-मी-फीच्या दिवशी आसाममध्ये बँका बंद राहणार आहेत.

 

Web Title :- Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

 

हे देखील वाचा :

Solapur ACB Trap | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याला 2 लाख लाच स्वीकारताना अटक

Gold Price Today | ऐन लग्नसराईत सोन्याचे दर गगनाला भिडले ! GST सह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार

Amol Mitkari | ‘नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी’ – अमोल मिटकरी

Related Posts