IMPIMP

BARTI Pune – Social Welfare | ‘सामाजिक न्याय पर्व’ अंतर्गत कार्यशाळेत कायद्यांविषयी जनजागृती

by nagesh
BARTI Pune - Social Welfare | Public awareness about laws in workshop under 'Social Justice Parva'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- BARTI Pune – Social Welfare | सहायक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने आयोजित ‘सामाजिक न्याय पर्व ‘ (Samajik Nyay Parv) उपक्रमाअंतर्गत जनजागृती व्याख्यानास आणि कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. अ‍ॅड. सतीश कांबळे (Adv Satish Kamble) यांच्यासहित अनेक कायदे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन विषयक कायदा ,जेष्ठ नागरिकांविषयक कायद्यांवर या उपक्रमात चर्चा करण्यात आली. (BARTI Pune – Social Welfare)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अ‍ॅड. सतीश कांबळे म्हणाले,’ अ‍ॅट्रोसिटी (Atrocity Act) आणि जेष्ठ नागरिकांविषयक कायद्यांबद्दल जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रात कार्यरत संस्था ,व्यक्तीनी पुढाकार घेतला पाहिजे’. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),  समाजकल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर (Assistant Commissioner of Social Welfare, Sangita Davkhar), पोलीस अधिकारी श्रीमती तावरे, यशवंत गवारी (Police Officer Yashwant Gawari), रेखा आनंद (National Helpline Rekha Anand) हे उपस्थित होते. सरकारी अभियोक्ता पाटील, प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर (Sheetal Bandgar) यांनीही मार्गदर्शन केले. पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सफाई कमर्चारी, पुणे जिल्हा समता दूत कार्यशाळेत सहभागी झाले. हा कार्यक्रम विश्रांतवाडी येथीलसामाजिक न्याय भवन (Social Justice Bhavan Vishrantwadi) येथे सोमवारी झाला. BARTI Pune – Social Welfare

 

 

Web Title :-   BARTI Pune – Social Welfare | Public awareness about laws in workshop under ‘Social Justice Parva’

 

हे देखील वाचा :

SPPU News – International Dance Day | 29 एप्रिल 2023 : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस – विद्यार्थी, कलासक्तांचा एक खुला रंगमंच ‘ अंगणमंच ‘..!

Maharashtra Politics News | सुप्रिम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, अ‍ॅड. आशिष गिरी यांची ‘ती’ याचिका फेटाळली

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

 

Related Posts