IMPIMP

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर
गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी
पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील
सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. सोमय्या यांच्या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
होण्याची शक्यता आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कथित 19 बंगले प्रकरणावरुन किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:चे 19 बंगले गायब केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून स्वत:च 15 जानेवारी 2021 ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी कारायची, कुठे करायची, काय करायची हे उद्धव ठाकरे यांनीच ठरवले. त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन करायचे आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आला असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

 

या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि 19 बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Food Festival Pune PMC | पुणे महानगरपालिका न्यूज : पंतप्रधान स्वनिधी 2.0 महोत्सव अंतर्गत पुण्यातील 9 ठिकाणी फूड फेस्टिव्हल, जाणून घ्या ठिकाणे आणि वेळा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – तिप्पट पैसे परत केल्यानंतरही दिली जीवे मारण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍याला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – उपचारासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणार्‍या डॉक्टराला अटक

 

Related Posts