IMPIMP

Maharashtra Politics News | सुप्रिम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, अ‍ॅड. आशिष गिरी यांची ‘ती’ याचिका फेटाळली

by nagesh
Maharashtra Politics News | supreme court dismissed plea against thackeray camp which demand shivsena bhavan and property handover to new party

दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics News | शिवसेना पक्ष (Shiv Sena party) आणि चिन्ह (Dhanushyaban Symbol) गमावल्यानंतर ठाकरे गटाकडे पक्षाची असलेली संपत्तीही शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका अ‍ॅड. आशिष गिरी (Adv. Ashish Giri) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गिरी यांची याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांनाच (Maharashtra Politics News) फटकारले आहे. ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेना भवनासह (Shiv Sena Bhavan) पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. आशिष गिरी यांना न्यायालयाने याप्रकरणी फटकारले आहे. संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण (Maharashtra Politics News) असा प्रश्न विचारत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे शिवसेना भवन आणि शिवसेना शाखा आणि पक्षाचा निधी (Party Funds) उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजपसोबत (BJP) राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष व चिन्ह यावर दावा केला होता. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे (Election Commission) अर्ज केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर शिवसेना भवन आणि पक्ष निधी कोणाचा यावरुन चार्चा सुरु झाली होती. दरम्यान, शिंदे गटाकडून यावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, वकील गिरी यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा आणि शिंदे गटाचा थेट काहीही संबंध नव्हता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics News | supreme court dismissed plea against thackeray camp which demand shivsena bhavan and property handover to new party

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | गायब झालेल्या फाईल आणि बंगल्यांची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? (व्हिडिओ)

Food Festival Pune PMC | पुणे महानगरपालिका न्यूज : पंतप्रधान स्वनिधी 2.0 महोत्सव अंतर्गत पुण्यातील 9 ठिकाणी फूड फेस्टिव्हल, जाणून घ्या ठिकाणे आणि वेळा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडकी पोलिस स्टेशन – तिप्पट पैसे परत केल्यानंतरही दिली जीवे मारण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍याला अटक

Related Posts