Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 चे उद्गघाटन झाले

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Bharti Vidyapeeth | दोन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा टेक्नो-इनोव्हा 2023 चा शुभारंभ भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के. डी. जाधव सहकार्यवाह, भारती विद्यापीठ पुणे (Pune News), यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्कृती आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास कसा करावा हे सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कविता कौशिक संचालिका, गुणवत्ता नियंत्रण विभाग कमिन्स इंडिया लिमिटेड पुणे, यांनी आपल्या भाषणात सांगितले की बदलत्या काळात ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत आहे ते आत्मसात करून विद्यार्थ्यांनी जीवनातील नवनवीन क्षितिजांचा ध्यास घेतला पाहिजे. (Bharti Vidyapeeth)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
तंत्रनिकेतनचे प्राचार्य राजेंद्र उत्तुरकर यांनी आपल्या भाषणात भारती विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. टेक्नो इनोव्हा च्या संयोजीका प्रा. सुजाता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले. या शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेसाठी देशभरातील 243 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तंत्र-भारती या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. अरिहंत आवटे याने आभार प्रदर्शन केले. कु. समीक्षा जाधव व कु. आर्यन रेवणकर यांनी सूत्रसंचालन केले. (Pune News)
Web Title :- Bharti Vidyapeeth | Techno-Inova 2023 inaugurated at Jawaharlal Nehru Tanrniketan, Bharati University
Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न
Comments are closed.