IMPIMP

Bhaskar Jadhav | भाजप आकसापोटी विरोधकांवर करत आहे कारवाई – आ. भास्कर जाधव

by nagesh
Bhaskar Jadhav | bhaskar jadhav reaction on election commission shivsena party case

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुटकेवर भाष्य केले आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मागे उभे असलेले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत, त्या सर्वांवर आकसाने कारवाई करण्याचे काम सध्या राज्यात सुरु आहे. त्यातूनच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई केली गेली होती, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले आहेत.

 

संजय राऊत यांची सुटका पीएमएलए न्यायालयाने केली. त्याचसोबत विशेष न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढले. हे ताशेरे केवळ ईडीवर नाहीत, तर केंद्र सरकारच्या कारभारावर आहेत. केंद्र सरकारच्या कृतीवर आहे. केंद्र सरकारच्या प्रवृतीवर आहेत. या प्रकरणात दिवाणी स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन घेतला पाहिजे होता. पण ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत संजय राऊत यांना या प्रकरणात गोवले. राकेश वाधवान यांना या प्रकरणात आरोपी करायला पाहिजे होते. पण ईडीने तसे केले नाही. ईडीच्या कारभारावर न्यायालयाने स्पष्ट मत नोंदविले आहे. त्यामुळे संजय राऊत प्रकरणात त्यांना जो त्रास झाला, त्यांच्या कुटुंबियांना जो त्रास झाला, ते पाहून आता ईडीचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. आणि यापुढे ते कोणालाही बेकायदेशीररित्या आत डांबणार नाहीत, असे जाधव म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सत्ताधारी पक्षाचे लोक आम्ही हातपाय तोडू म्हणतात, कोणी शोधून शोधून मारु म्हणतात, कोणी गोळीबार करतोय, कोणी महिलांचा अपमान करत आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. केवळ विरोधकांवर कारवाईचा बडगा भाजप आणि राज्य सरकार उगारत आहे. पण आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांच्यामागे उभे राहणार आहोत. त्याचप्रकारे मडवी म्हणून आमच्या एका नगरसेवकाला जाणीवपूर्वक तडीपार केले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा काढून देखील आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ईडी कुणाच्यातरी दबावाखाली कोणालाही अटक करते. त्यामुळे आम्हाला नाही, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात अटकेची भीती आहे.
गुलाबराव पाटील आणि सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता.
आता कुणाचाच धाक त्यांना राहिला नाही, म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत.
भाजपचा छोटे मोठे प्रांतिक पक्ष संपवण्याच्या डाव नव्हे, तर कार्यक्रम आहे,
असे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) म्हणाले होते, असेही यावेळी जाधवांनी सांगितले.

 

Web Title :- Bhaskar Jadhav | BJP is taking action against the opposition

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | अटकेची घाई, सुनवाई मात्र नाही; विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशाची ईडीवर टीका

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Chitra Wagh | संजय राठोड प्रकरणावर आता पडदा टाकुयात – चित्रा वाघ

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्रMumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेन समोर नवीन अडथळा, गोदरेज कंपनीचे राज्य सरकार विरोधात प्रतिज्ञापत्र

 

Related Posts