IMPIMP

Bhaskar Jadhav | आमदार नितीन देशमुख यांच्यावर मुद्दाम गुन्हा दाखल केला – भास्कर जाधव

by nagesh
Bhaskar Jadhav | bhaskar jadhav reaction on election commission shivsena party case

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे पडसाद आज विधीमंडळात पहायला मिळाले. ‘तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो’ असा धमकीवजा इशारा पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांना दिला असल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. सभागृह चालू असताना ३५३ अ अंतर्गत कारवाई आमदार नितीन देशमुखांवर केली असून हा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आमदार नितीन देशमुख हे रवी भवन येथील बंगल्यावर २०० जनांची गर्दी घेऊन चालले होते.
येणाऱ्या सर्वांचे पास तयार करावे लागतील असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
यावर नितीन देशमुख आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना दमदाटी केली मात्र हा
गुन्हा मुद्दाम दाखल करण्यात आल्याचा आरोप आमदारांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे या प्रकरणात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल.’(Bhaskar Jadhav)

 

नेमके घडले काय?

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कांबळे यांची ड्युटी रवी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लागली होती.
कांबळे हे रवी भवन येथे येणाऱ्या व्यक्तींचे पासेस चेक करून त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.
मंगळवारी (ता. 27 डिसेंबर) सायंकाळी आमदार देशमुख यांनी हाताने धक्का देऊन जबरदस्तीने त्यांच्यासोबत
असलेल्या काही लोकांना घेऊन विनापास रवी भवनच्या आतमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे नितीन देशमुख व त्यांच्यासोबतच्या साथीदारांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार कांबळे यांनी सदर पोलीस ठाण्यात दिली होती.
यानंतर आमदार नितीन देशमुखांसह अन्य लोकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कांबळेंनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आमदार नितीन देशमुख यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप करणे,
सरकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना अपशब्द वापरणे त्यांना शिवीगाळ करणे याबाबत भादंवि संहिता कलम ३५३, १८६,
४४८, २९४, ५०६ आणि ३४ अंतर्गत नागपुरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bhaskar Jadhav | it is claimed that mla nitin deshmukh was threatened to be arrested by the police officer in nagpur

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अखेर अनिल देशमुख 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनी तुरुंगाबाहेर, ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळण; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Phone Tapping Case | मला आजही भीती वाटते कुणाशी कसं…; फोन टॅपिंग प्रकरणावर एकनाथ खडसेंचे सभागृहात विधान

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

 

Related Posts