IMPIMP

Bhau Rangari Bhavan | भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट

by sachinsitapure
Bhau Rangari Bhavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Bhau Rangari Bhavan | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला. (Bhau Rangari Bhavan)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान तसेच त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारलेली चळवळ यासंबंधीची माहिती या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली. (Bhau Rangari Bhavan)

Related Posts