IMPIMP

Video : सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला इशारा, म्हणाले- ‘आता एकच पर्याय तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार !’

by sikandershaikh
Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

‘आता एकच पर्याय तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी स्वत: मागणी करणार’

अधिवेशनात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमच्या राज्यातील आई-बहिणींना नग्न करून नाचायला लावलं जात आहे. यासंबंधीचे सर्व व्हिडीओ आहेत तरीही तुम्ही सांगता की, आम्ही नोंद घेऊ असं म्हणत त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर टीका केली. सोबतच ते म्हणाले, आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे राष्ट्रपती राजवट असा इशारा देखील मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिला.

‘चौकशीनंतर दोन दिवसात तात्काळ करावाई करणार’

मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या या वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे असं सांगितलं.
चौकशीनंतर दोन दिवसात तात्काळ करावाई करणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलं.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान मंगळवारी सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली.
यात संबंधित कृत्याचा व्हिडीओ देखील सादर करण्यात आला.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीनं याची दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केली राजकीय खेळी ?

Related Posts