IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | ‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, ‘ओवैसीला’ औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..’; नितेश राणेंचा कडक इशारा

by nagesh
MLA Nitesh Rane | file a case against nitesh rane for violation of code of conduct shiv sena demand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP MLA Nitesh Rane | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (MIM Leader Akbaruddin Owaisi) यांनी काल (गुरुवारी) शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील (Aurangabad) विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना त्याचबरोबर औरंगजेबाच्या कबरीलाही त्यांनी भेट दिली होती. याच विषयावरुन आता राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. ‘तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं,’ वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केलं. यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”राज्यातील पोलिसांना दहा मिनिटांसाठी बाजूला केले तर अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाकडेच पाठवू. अन्यथा आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणार नाही,” असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. ”मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, ” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

 

 

तसेच, नितेश राणेंनी दुसरंही ट्विट केलं आहे. “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का ? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…असं म्हणत नितेश राणेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला आहे.

 

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | keep away police for 10 minutes we will see mim akbaruddin owaisi says bjp mla nitesh rane

 

हे देखील वाचा :

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक; माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून घातला गंडा

Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून 3 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ACB च्या जाळ्यात

 

Related Posts