IMPIMP

MP Vinayak Raut | ‘…पण त्यांना आपल्या दरवाज्यातही उभे करु नका’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विनायक राऊतांचा सूचक सल्ला

by nagesh
MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut comment on raj thackeray statement over current political situation

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राज्यात सत्तेचा बाजार मांडलाय, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यावर आपलं मत व्यक्त करताना शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले, सत्तेचा बाजार मांडणारे आपल्याकडे येतील. पण त्यांना आपल्या दरवाजातही उभे करु नका, हीच एक प्रार्थना, असा सूचक सल्लाही विनायक राऊत (MP Vinayak Raut) यानी दिला. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) सांगूनच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर बंडखोर (Rebel), असा शिक्का मारलेला नाही. शिंदे गटाला (Shinde Group) आम्ही अलीबाबा आणि चाळीस चोर असं शंभर वेळा म्हणू. राज ठकरेंनी उजळ माथ्याने शिवसेना सोडून नवी पक्ष स्थापन करतोय असं बाळासाहेबांना सांगितलं होतं. माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय आजोबांचा आणि बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, या विधानाचे विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी स्वागत केलं.

 

ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारातून राज ठकरेसुद्धा निर्माण झाले आहेत. तसेच बाळासाहेबांच्या विचारातून आम्ही तरलो आहोत. लोकशाहीच्या निवडणुकीत चिन्ह (Election Symbol) पाहिजे म्हणून ते दिलेले चिन्ह आहे. त्या चिन्हापेक्षा विचार महत्त्वाचा आहे. आम्ही विचाराने पुढे जाणार आहोत, असेही विनायक राऊत म्हणाले.

 

न्यायालयाचा निर्णय मान्य पण…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे (Constitution Bench) सोपवण्यात आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य पण न्यायालयाला माझी हात जोडून विनंती असेल
न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जेव्हा हा खटला जाईल, त्यावेळेला काल मर्यादेमध्ये या खटल्याचा निकाल लागावा. अशी विनंती त्यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut comment on raj thackeray statement over current political situation

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘नुपूर शर्मा स्वत:च्या मनातलं बोलल्या नाहीत, तर…’ राज ठाकरेंनी केलं समर्थन

Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | ‘उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील’ – राज ठाकरे

Maharashtra Political Crisis | पक्षाच्या चिन्हाबाबत शिवसेनेला तुर्तास दिलासा; सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

 

Related Posts