IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘नुपूर शर्मा स्वत:च्या मनातलं बोलल्या नाहीत, तर…’ राज ठाकरेंनी केलं समर्थन

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | raj thackeray reaction on nupur sharma statment and bjp shivsena war

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. राज ठाकरे यांनी आज रवींद्र नाट्यमंदिर (Ravindra Natya Mandir) येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी ठाकरी शैलीत भाषण केले. यात शिवसेना (Shivsena) आणि भाजपसह (BJP) अनेक राजकीय पक्षांवर आणि नेत्यांवर टीका केली. नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रकरणावरही राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना काढून टाकलं. सगळ्यांनी माफी मागितली. मात्र, मी शर्मांचं समर्थन केलं, त्यांची बाजू घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुढे म्हणाले, नुपूर शर्मा स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नव्हत्या. झाकीर नाईक (Zakir Naik) त्यांच्या मुलाखतीत त्यांनीही तेच सांगतिलं जे नुपूर शर्मा बोलत होत्या. मात्र नाईक यांना कोणीच काही बोललं नाही. माफी मागायला सांगितलं नाही, ओवैसी (Asaduddin Owaisi) आमच्या देवी देवतांबद्दल बोलतात. शेवट बोलले ते की ‘भगवान के कैसे कैसे मनहुस नाम रखते है’. आमच्या देवी देवतांना असलं बोललं तरी कोणी माफी मागायला सांगणार नाही. या देशात चांगले मुस्लिमही (Muslim) आहेत, पण हे चांगले नाहीत. मात्र, सरकार त्यांच्या जीभेवर कोणत्याही प्रकारची बंधने आणायला तयार नाही, अशी खंतही ठाकरेंनी बोलून दाखवली.

 

बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane) आणि नुकतीच झालेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करु नका. मी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. माझं बंड भुजबळ, राणे, शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले. पण मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की राज ठाकरे आता पक्षात राहात नाही… ती माझी शेवटची भेट होती, असं त्यांनी सांगितले.

 

बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले…

यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीवर (Matoshree) भेटल्याचा प्रसंग सांगितला. मी आजपर्यंत ती गोष्ट तुम्हाला कधी बोललो नाही. मी मातोश्रीवर गेलो तेव्हा तिथे माझ्यासोबत मनोहर जोशी (Manohar Joshi) होते. ते खोलीच्या बाहेर गेल्यानंतर बाळासाहेबांनी मला बोलवलं. माझ्यासमोर अलिंगना साठी हात पसरले. मला मिठी मारली आणि म्हणाले ‘आता जा’. त्यांना समजलं होतं. मी जाणार आहे. त्यामुळे मी दगाफटका करुन, गद्दारी करुन, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. तुमच्या विश्वासावर नवा पक्ष उभा केला, असं राज ठाकरेंनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसे आंदोलन अपूर्ण सोडत नाही

यावेळी राज ठाकरे यांनी टोलच्या (Toll) मुद्यावरुन हल्लाबोल केला. ते म्हणाले, मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे.
मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही.
टोलमुक्ती चे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं.
शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही ? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता.
मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही.
म्हणजेच हा टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो, आणि म्हणून नेते टोलबाबत प्रश्न विचारत नाहीत, तसेच मी टोल बंद करुन दाखवतो असं ते म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray reaction on nupur sharma statment and bjp shivsena war

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray On Shinde-Fadnavis Govt | ‘उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील’ – राज ठाकरे

Maharashtra Political Crisis | पक्षाच्या चिन्हाबाबत शिवसेनेला तुर्तास दिलासा; सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Early Puberty Signs | तुमचा मुलगा किंवा मुलगी अकाली तरुण होत आहेत का? ‘ही’ लक्षणे दिसताच पालकांनी व्हावे सतर्क

 

Related Posts