IMPIMP

Black Tea For White Hair | पांढऱ्या केसांवर जादूप्रमाणे काम करतो ब्लॅक टी, या ४ पद्धतीने मिळतील ‘डार्क हेअर’

by nagesh
Black Tea For White Hair | black tea for premature white hair mix with coffee basil leaves ajwain celery naturally dark

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Black Tea For White Hair | आजकाल २५ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणी डोक्यावर पांढरे केस वाढू लागल्याने चिंतेत असतात. अशावेळी त्यांना कमी आत्मविश्वास आणि लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. हे लपविण्यासाठी अनेकजण केमिकलयुक्त हेअर डाय वापरतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते, यामुळे केस कोरडे होतात. जर तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर तुम्ही ब्लॅक टी वापरू शकता. यामुळे केस काळे (Black Tea For White Hair) तर होतीलच शिवाय कोरडेपणाही दूर होईल (Black Tea For Premature White Hair).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

१. ब्लॅक टी आणि ओवा :
पांढरे केस काळे करण्यासाठी २ चमचे ओवा आणि तेवढ्याच प्रमाणात ब्लॅक टी बॅग घ्या आणि त्यात २ चमचे मेंदी पावडर मिसळा आणि पाण्यात उकळवा. ते थंड झाल्यावर केसांना लावा आणि एक तास सुकवा आणि शेवटी स्वच्छ पाण्याने केस धुवा.

 

२. ब्लॅक टीचा थेट वापर :
ब्लॅक टी केसांसाठी औषधापेक्षा कमी नाही, त्यात टॅनिक अ‍ॅसिड असते जे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत करते. यासाठी सुमारे २ कप पाणी घ्या आणि त्यात सुमारे ५ चमचे चहापत्ती टाकून उकळवा. थंड झाल्यावर या ब्लॅक टीने केस भिजवा. अर्धा तास ठेवून शेवटी कोमट पाण्याने डोके धुवावे.

 

३. ब्लॅक टी आणि कॉफी :
या दोघांचे कॉम्बिनेशन केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यासाठी २ चमचे कॉफी बीन्स घ्या आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगले बारीक करा आणि २ कप पाण्यात मिसळल्यानंतर ते उकळवा. नंतर त्यात २ ब्लॅक टी बॅग टाका आणि नंतर उकळवा. थंड झाल्यावर केसांना लावा आणि तासभर राहू द्या. शेवटी केस स्वच्छ पाण्याने धुवा.

 

४. ब्लॅक टी आणि तुळस :
यासाठी १ कप पाण्यात ५ चमचे ब्लॅक टी मिक्स करा आणि नंतर ३-४ तुळशीची पाने टाकून उकळवा.
आता लिंबाचा रस घाला. शेवटी हे मिश्रण केसांना लावा. ही पद्धत काही आठवडे केल्यानंतर,
पांढरे केस पुन्हा काळे होतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Black Tea For White Hair | black tea for premature white hair mix with coffee basil leaves ajwain celery naturally dark

 

हे देखील वाचा :

Winter Session -2022 | ‘मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण…’, उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी दाखवला पेन ड्राईव्ह

Tomato Benefits | रिकाम्यापोटी का सेवन करावा टोमॅटो? जाणून घ्या याचे ४ जबरदस्त फायदे

Neha Malik | नेहाने शेअर केले ख्रिसमस सेलिब्रेशनचे हॉट फोटोज; फोटो व्हायरल

 

Related Posts