IMPIMP

Blood Sugar | बटाटा खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

by nagesh
Green Sprouted And Shrunken Potatoes | dangerous side effects of eating green sprouted and shrunken potatoes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Blood Sugar | आपल्या सर्वांना बटाटे खायला आवडतात. बटाटा हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय आपल्या ताटाची चव अपूर्ण राहते. बटाट्यामध्ये (potato) फायबर (Fiber), पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6) सारख्या पोषकतत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. (Blood Sugar)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतक्या गुणांनी समृद्ध बटाट्याचे सेवन शुगरच्या रुग्णांना करता येईल का, हा प्रश्न अनेकदा मनात येतो. शुगरचे रुग्ण त्यांचा आहार अतिशय काळजीपूर्वक घेतात, ते त्यांच्या आहारात अशा पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level Control) नियंत्रित राहिल.

 

बटाट्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स साखर वाढवू शकतात :
बटाटा हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतो, ज्यामुळे शुगरच्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्ण बटाटे खाणे टाळतात. WebMD. com नुसार, बटाट्याचे सेवन केल्याने, मधुमेही रुग्णांच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्स सिंपल शुगरच्या रूपात रक्तात मिसळतात आणि रक्ताभिसरण करत राहतात, ज्यामुळे रक्तातील साखर दीर्घकाळ वाढते. (Blood Sugar)

 

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याबाबत काळजी न घेतल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी आणि दृष्टीदोष होण्याचा धोका असतो. त्यामुळेच साखरेच्या रुग्णांना कार्बोहायड्रेट जास्त असलेले बटाटे न खाण्याचा सल्ला दिला जातो. बटाट्याचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढते.

ग्लायसेमिक इंडेक्स काय सांगतो :
ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) तुम्हाला सांगतो की काही पदार्थ खाल्ल्याने तुमच्या ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते. ग्लायसेमिक लोड किती उच्च असेल हे जाणून घेण्यास मदत करतो. इतर पदार्थांपेक्षा बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. आहारतज्ञ शुगर रुग्णांना आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करण्यास सांगतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शुगरच्या रुग्णांना बटाटे खाण्याची इच्छा असेल तर त्यांनी बटाटे खाण्याची पद्धत बदलावी.
बटाटे शिजवल्यानंतर थंड केल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 25 ते 28 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
बटाट्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यानेही तो कमी होऊ शकतो.

 

किती ग्लायसेमिक इंडेक्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी जास्त :

High glycemic index – 20 आणि त्यापेक्षा जास्त असतो.

Medium glycemic index – 11-19 असतो.

Low glycemic index – 10 आणि त्यापेक्षा कमी असतो.

शिजवलेल्या बटाट्याचे GL 33 असते, तर पांढर्‍या उकडलेल्या बटाट्याचे GL 25 असते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी वाढू शकते.

 

 

Web Title :- Blood Sugar | can diabetic patient eat potato knows how its effect on blood sugar

 

हे देखील वाचा :

NCP Prashant Jagtap | ‘कॉफी टेबल बुक’साठी भाजपचा पुणे मनपाच्या तिजोरीवर ‘दरोडा’, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Indrani Balan Foundation | आर्मी गुडविल स्कूलच्या उभारणीसाठी लष्कर व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामध्ये दूसरा सामंजस्य करार

Budget Expectation | 2022 च्या अर्थसंकल्पात बीडी वरील कर वाढवू नका, RSS शी संबंधित संघटनेने केली मागणी

Gangubai Kathiawadi | अखेर आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ या दिवशी होणार प्रदर्शित..

 

Related Posts