IMPIMP

NCP Prashant Jagtap | ‘कॉफी टेबल बुक’साठी भाजपचा पुणे मनपाच्या तिजोरीवर ‘दरोडा’, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

by nagesh
NCP Prashant Jagtap | BJP s robbery on Pune Municipal Corporation's coffers for Coffee Table Book NCP s city president Prashant Jagtap accused

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महानगरपालिकेतील (Pune Corporation) सत्ताधारी भाजपने (BJP) पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून केवळ भाजपच्या जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच एरवी विकासकामांसाठी महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी (Coffee Table Book) मात्र महानगरपालिकेची तिजोरी ओसंडून वाहत आहे. कॉफी टेबल बुकसाठी भाजपने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात पुणेकरांचे (Pune Corona) झालेले हाल आपण सर्वांनीच बाघितले आहेत.
जम्बो कोविड हॉस्पिटल (Jumbo Covid Hospital) व इतर सुविधांची पुणेकरांना नितांत आवश्यकता असताना पैसेच नाही असं रडगाणं सत्ताधारी भाजपने मांडलं.
कोरोनाच्या भयावह संकटात पुणे शहरातील तब्बल 9114 नागरिकांनी आपले प्राण गमावले.
मात्र कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सामान्य पुणेकरांच्या हक्काच्या निधीस हात घातला आहे.
या माध्यमातून आपल्या काही हितचिंतकांचा आर्थिक फायदा व्हावा हाच भाजपचा डाव आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधार्यांनी दरोडा टाकला आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

 

 

पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या माहितीसह पुणे शहराचा शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास व पुणे शहराने केलेली प्रगती जगासमोर मांडली होती.
भारतीय जनता पक्षाच्या काळात तयार झालेल्या कॉफी टेबल बुकमध्ये मात्र कोरोनाच्या काळात पुणेकरांचे झालेले हाल जगासमोर मांडले जाणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहराच्या इतिहासातील एक काळा अध्याय कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून या गोष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Dr. Ashish Bharti) यांना निवेदन दिले आहे,
तसेच या निविदेची चौकशी करण्यासाठी नगरविकास विभाग (Urban Development Department), गृह विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सीआयडी (CID) यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे.
अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी यावेळी मांडली.

 

 

‘गली गली में शोर है, भाजपा चोर है’, ‘भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला.
यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal), रविंद्र माळवदकर (Ravindra Malwadkar), प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), नगरसेवक महेंद्र पठारे (Corporator Mahendra Pathare), नगरसेविका रेखा टिंगरे (Corporator Rekha Tingre), स्मिता कोंढरे (Smita Kondhare) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- NCP Prashant Jagtap | BJP s robbery on Pune Municipal Corporation’s coffers for Coffee Table Book NCP s city president Prashant Jagtap accused

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | आर्मी गुडविल स्कूलच्या उभारणीसाठी लष्कर व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामध्ये दूसरा सामंजस्य करार

Budget Expectation | 2022 च्या अर्थसंकल्पात बीडी वरील कर वाढवू नका, RSS शी संबंधित संघटनेने केली मागणी

Gangubai Kathiawadi | अखेर आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ या दिवशी होणार प्रदर्शित..

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts