IMPIMP

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा

by nagesh
British PM Liz Truss | british prime minister liz truss announced thursday her resignation as conservative party leader

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारुन अवघे काही आठवडेच झाले होते. पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानांची निवड केली जाणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांनी काही धोरणांची अंमलबजावणी केली. परंतु त्यांनी ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यात पक्षाचा विश्वास गमावला आहे. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लिझ ट्रस यांनी 6 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधानपदाची (British PM Liz Truss) जबाबदारी स्वीकारली होती. परंतु अवघ्या 45 दिवसांमध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ (Rise in Food Prices) झाली आहे. याच कारणामुळे येथील महागाई 40 वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही 1980 नंतरची सर्वात मोठी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवर (Inflation) नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान होते. महागाई आणि राबवलेल्या अर्थविषयक धोरणामुळे लिझ यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

 

 

पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना लिझ ट्रस म्हणाल्या, कंझर्व्हेटिव्ह पक्षातर्फे (Conservative Party (UK) माझी नेता म्हणून निवड झाली होती.
मात्र मी दिलेली आश्वासने पूर्ण करु शकले नाही. मी माझ्या पक्षाचा विश्वास गमावला आहे.
याच कारणामुळे पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे.
मी सर ग्रॅहम ब्रॅडी (Sir Graham Brady) यांची भेट घेतली आहे.
पुढील आठवड्यात आगामी नेतृत्वाची निवड केली जाईल.
देशाची आर्थिक स्थिरता तसेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे लीझ यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- British PM Liz Truss | british prime minister liz truss announced thursday her resignation as conservative party leader

 

हे देखील वाचा :

Pune News | हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव; जगातील शंभर अग्रेसर शहरांच्या समुहाकडून पुरस्कार जाहीर

Yashomati Thakur | राम आणि रावण या दोन प्रवृत्ती होत्या आणि त्या…, यशोमती ठाकूर यांचा अनिल बोंडेंना टोला

MNS Chief Raj Thackeray | शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात साजरी करा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

 

Related Posts