IMPIMP

Yashomati Thakur | राम आणि रावण या दोन प्रवृत्ती होत्या आणि त्या…, यशोमती ठाकूर यांचा अनिल बोंडेंना टोला

by nagesh
Yashomati Thakur | It is BJP's job to spread rumours, they were doing the same even during independence

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी काँग्रेस नेते (Congress Leader) आणि खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्यावर टीका केल्याने ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थनी आले आहेत. त्यांच्यावर आता काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाष्य केले आहे. खासदार अनिल बोंडे यांचे डोके फिरले आहे. त्यांना गुंर्मी आली आहे, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे डोके फिरले आहे. त्यांना फार गुर्मी आली आहे. दिवाळसणाचा काळ आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. दोनशे लोकांमधून दोन लोकांना राज्य सरकारने मदत केली आहे. त्यासंदर्भात आम्ही महसूल विभागाकडून (Revenue Department) माहिती घेतली आहे. त्यामुळे भाजप (BJP) नेते आणि राज्य सरकार (State Government) जे काही करत आहे, ते योग्य नाही, असे ठाकूर म्हणाल्या.

 

तसेच बोंडे यांनी राम आणि रावणाचा उल्लेख केला. राम आणि रावण या दोन व्यक्ती होत्या. दोन प्रवृत्ती होत्या. त्यामुळे प्रत्येक माणसामध्ये राम आणि रावण दोघेही असतात. आता त्यांच्या मनात जे असते, तसे त्यांना दिसत असते. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या. शेतकऱ्यांचे पैसे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे. ओला दुष्काळ (Wet Drought) राज्यात जाहीर झाला पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली.

 

खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) टीका केली होती.
‘रा’ वरुन राम नाही तर रावण असा अर्थ निघतो. रामाने उत्तरेपासून दक्षिणेला कूच केले होते.
पण गांधी उलट करत आहेत. ते दक्षिणेपासून उत्तरेला चालत येत आहेत. त्यामुळे त्यांच्यात राम नाही.
राहुल गांधी आणि रावणात जास्त साम्य आहे, असे बोंडे म्हणाले होते. त्यावर काँग्रेस आक्रमक झाली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Yashomati Thakur | Rama and Ravana were two tendencies and they…, Anil Bondena Tola by Yashomati Thakur

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात साजरी करा, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Uddhav Thackeray | ठाण्यात सभा लावा, हा मी आलोच, उद्धव ठाकरेंची ठाण्यात धडाडणार तोफ

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

 

Related Posts