IMPIMP

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

by nagesh
Pune ACB Trap | Two arrested along with a legal consultant who took bribe of 40 thousand for giving favorable report

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – Buldhana ACB Trap | विवाह नोंदी करण्यासाठी दिलेली कागदपत्रे परत करण्यासाठी साखरेच्या पोत्यासह ४
लाख रुपयांची लाच (Bribe) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यापैकी १ लाख रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Buldhana ACB
Trap) बोराखेडी येथील ग्राम विकास अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रामचंद्र गुलाबराव पवार Ramchandra Gulabrao Pawar (वय ५४) असे या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री
साडेआठ वाजता करण्यात आली.

 

बोराखेडी येथील तक्रारदाराने २००८ मध्ये ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat Borakhedi) विवाहाची नोंद केली होती. त्यासाठी दिलेली कागदपत्रे
परत हवी होती. त्यासाठी त्यांनी पवार याच्याकडे अर्ज केला होता. ही माहिती देण्यासाठी पवार यांनी ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्याची पडताळणी केली असता तडजोडीमध्ये २ लाख १ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी
पवार याने १ हजार रुपये फोन पेद्वारे स्वीकारले होते. त्यानंतर उर्वरित रक्कमेपैकी १ लाख रुपये तक्रारदाराला तात्काळ घेऊन येण्यास पवार याने
सांगितले. त्यानुसार बुलढाण्यातील चिखली रोडवरील एका कंत्राटदाराच्या बंगल्यासमोर रात्री साडेआठ वाजता सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून
१ लाख रुपये घेताना रामचंद्र पवार याला पकडण्यात आले. (Buldhana ACB Trap)

 

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी (Deputy Superintendent of Police Sanjay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचीन इंगळे (PI Sachin Ingle),
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम भांगे (Assistant Sub-Inspector of Police Shyam Bhange),
पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, पोलीस नायक मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी,
जगदिश पवार, विनोद लोखंडे, सुनील साऊत, रविंद्र दळवी, वाती वाणी व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Buldhana ACB Trap | A bribe of 4 lakhs was demanded along with a bag of sugar; Village development officer in the net while taking bribe of 1 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

 

Related Posts