IMPIMP

ठाकरे की फडणवीस? ‘प्रश्नावर भांडणारे आपण, मग लाखो बेरोजगार तरुण, शिक्षकांसाठी भांडायचं कुणी?’

by pranjalishirish
chala-hawa-yeu-dya-arvind-jagtap-devendra-fadnavis-uddhav-thackeray-politics-in-maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम- झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ ही विनोदी मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील लेखक अरविंद जगताप Arvind jagtap यांची पत्रेही प्रसिद्ध आहेत. या पत्रांच्या माध्यमातून देशभरातील घटनांवर भाष्य केले जाते. आता अरविंद जगताप Arvind jagtap यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी राजकीय प्रश्नावर भाष्य केले. त्यामध्ये उद्योगधंद्याविषयी लिहिले आहे.

आपल्या पत्रातून विविध विषयांवर भाष्य करणारे अरविंद जगताप Arvind jagtap यांनी लिहिलेला ब्लॉग आता चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यांनी ज्या राजकीय मुद्यांवर हात घातला आहे. तो सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यांच्या या ब्लॉगमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी ठाकरे की फडणवीस हा प्रश्न नसला पाहिजे. नोकरी की उद्योगधंदा हा प्रश्न असला पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच उद्योगधंद्यावर भाष्य करताना त्यांनी लिहिले, की मराठी माणूस व्यवसायात मागे का आहे? यावर फक्त चर्चाच होत असते. मात्र, कृती होत नाही. अगदी छोट्या गावात सचोटीने व्यवसाय करणारे व्यापारी अमराठी आहेत. पण त्यांच्यामध्ये एकी आहे.

राजकारणावर अरविंद जगताप लिहितात…

गेल्या कित्येक वर्षांत राज्यातील नेतृत्वाने प्रत्येक तालुका कुणाला तरी आंदण दिलाय. त्यामुळे राजकीय वतनदारी सुरू झाली. घराणेशाही मजबूत झाली. इंदिरा गांधींनी संस्थानांचे अधिकार काढून घेतले. पण राजकीय संस्थानांची मक्तेदारी सुरू झाली. जी जास्त भयंकर आहे. पक्ष, विचारधारा यापेक्षा कित्येक तालुके, जिल्हे एखाद्या राजकीय घराण्याचे गुलाम बनले. हे सत्ता असलेल्या कुठल्याही पक्षात घुसून बसणारे नवे संस्थानिक इंग्रजांपेक्षा भयंकर जुलमी बनले. फडणवीस का ठाकरे या प्रश्नावर भांडणारे आपण, पण आपल्याला लाखो बेरोजगार तरुणांची, लाखो बेरोजगार शिक्षकांची, लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांची, लाखो स्पर्धा परीक्षेची वाट पाहणाऱ्या तरुणांची काहीच पडलेली नाही. त्यांच्यासाठी कुणी भांडायचं? त्यासाठी एकी पाहिजे? प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नोकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे. हे विचार कायम आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येत असतात. अशाच विचारातून झेंडा चित्रपटासाठी लिहिलेलं सावधान हे गीत सुचलं.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts