IMPIMP

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

by nagesh
Chandrakant Patil | 'How much is this hypocrisy?', Flexbaji in Chandrakant Patal's constituency

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ओबीसींच्या अवमानाच्या मुद्यावरुन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आहे.
भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघात ‘किती हा ढोंगीपणा?’ अशा आशयाचे फ्लेक्स
लावण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) मतदारसंघात अशा प्रकारे फ्लेक्स लावण्यात आल्याने राजकीय
(Pune Political News) वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आगोदर कारवाई करा? आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj),  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले (Krantisurya Mahatma Jyotiba Phule) व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) व इतर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आज ओबीसींच्या (OBC) मान-अपनाच्या गोष्टी करणार? हा ढोंगीपणा बास करा, अशा मजकूराचे फ्लेक्स चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत.

 

राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari), आमदार चंद्रकांत पाटील, विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे फोटो छापण्यात आले आहेत. महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे या फ्लेक्सवर लिहिण्यात आले आहे.

 

 

Web Title : Chandrakant Patil | ‘How much is this hypocrisy?’, Flexbaji in Chandrakant Patal’s constituency

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

MLA Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

Pune Crime News | जनमित्रांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना तत्काळ अटक; थकबाकीमुळे वीजपुरवठा केला होता खंडित

 

Related Posts