IMPIMP

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrshekhar bawankule warning rahul gandhi over savarkar issue uddhav thackeray meet

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer
Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political News) वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास
आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसपूस पाहायला मिळत असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा
आहे. यावरुन भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल
गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांची माफी मागावी, मगच राज्यात पाय ठेवावा, असा धमकी वजा इशारा चंद्रशेखर बावनकुळे
(Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाच वेळा अपमान केला आहे. राहुल गांधींची अजूनही भूमिका बदललेली नाही, ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही. ते आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल माफी मागावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

 

राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल (Damage Control) असेल, तर आम्हाला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. सावकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली. त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजवण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी त्यांनी वीर सावरकर यांची माफी मागावी, मगच राज्यात पाय ठेवावा, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrshekhar bawankule warning rahul gandhi over savarkar issue uddhav thackeray meet

 

हे देखील वाचा :

Pune Cantonment Board | दिलासादायक ! आजपासून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये टोल वसुली बंद

Dada Bhuse | एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, दादा भुसेंची बोचरी टीका म्हणाले-‘छोटे युवराज…’

Pune Crime News | …म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन, हडपसरच्या काळेपडळमधील घटना

 

Related Posts