IMPIMP

Pune Cantonment Board | दिलासादायक ! आजपासून पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये टोल वसुली बंद

by nagesh
Pune Cantonment Board | No Vehicle Entry Tax In Pune Cantonment Area From Today

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – पुणे कॅन्टोन्मेंटच्या (Pune Cantonment Board) हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची (Vehicle Entry Tax) वसुली आता बंद करण्यात आली आहे (From Today, No Vehicle Entry Tax In Pune Cantonment Area). त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला (Pune Cantonment Board) गॅझेटच्या स्वरूपात आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाने टोल वसुली केंद्राला दि. 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यानंतर टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी (Pune Cantonment Board) वाहन प्रवेश कर हे उत्पन्नाचे म्हणजेच महसुलाचे मुख्य साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या 4 ही बाजुला 13 ठिकाणी असलेल्या टोल वसुली केंद्रामार्फत दरवर्षी बोर्डाला सुमारे 13 कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होत होता. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार बोर्डाचे उत्पन्नाचे हे साधन बंद झाल्याने उत्पन्नात घट होणार असली तरी या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. जीएसटीचा (GST) वाटा मिळण्यासाठी बोर्ड गेल्या काही वर्षापासून प्रतिक्षा करत आहे तर आता उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. एकंदरीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत टोल वसुली बंद झाल्याने नागरिकांना मोठया प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.

 

 

Web Title :-  Pune Cantonment Board | No Vehicle Entry Tax In Pune Cantonment Area From Today

 

हे देखील वाचा :

Dada Bhuse | एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा, दादा भुसेंची बोचरी टीका म्हणाले-‘छोटे युवराज…’

Pune Crime News | …म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन, हडपसरच्या काळेपडळमधील घटना

Maharashtra Political News | ‘मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली’, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

 

Related Posts