IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – “गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा”

by nagesh
Uddhav Thackeray | those raised by the shiv sainiks went into the box thackeray targets shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड पुकारल्यानंतर राज्यात महाविकास
आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. या सर्व घडामोडीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन
केले. परंतु आम्ही शिवसेना (Shivsena) सोडली नाही. आम्ही शिवसेनाच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. याचा वाद आता न्यायालयात
गेला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील काढून घेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मोठं विधान केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा,” असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

 

अपात्र आमदारांबाबत 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे निकाल शिवसेनेच्या बाजुने लागेल का शिंदे गटाच्या बाजूने लागेल? याबाबत चर्चा होत आहेत. यातच शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट पुढील काही दिवसांत प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. त्यामध्ये त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. मुंबई तसेच दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ यांच्याशी सातत्याने संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढताहेत.

 

पण, दुर्दैवाने यात अपयश आले तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, याबाबत आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आता समोर येत आहे. त्याचबरोबर ‘माझी प्रकृती ठिकठाक असल्याने आता दर दिवसाआड आपण शिवसेना भवनमध्ये उपलब्ध आहोत’, असही त्यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | Shivsena chief and former cm uddhav thackeray appeal party workers ready for new symbol

 

हे देखील वाचा :

Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार; सर्वत्र खळबळ

Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ठाणे, पालघरला ‘रेड अलर्ट’

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

 

Related Posts