IMPIMP

Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ठाणे, पालघरला ‘रेड अलर्ट’

by nagesh
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Rain Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Maharashtra Rain Update) सक्रिय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईसह (Mumbai) पुण्यात (Pune) पावसाचा जोर वाढला आहे. गुरूवारी सकाळपासून रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात पावसाचा जोर कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात जवळपास चारही विभागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चिंब झाला आहे.

 

शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच या शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) करण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबई आणि ठाणेपर्यंत मर्यादित असलेल्या पावसाने आता पालघरलाही घेरलं आहे. त्यामुळे या तीन शहरांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहेच. परंतु, आगामी दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस हे राज्यात पाऊस कायम असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघरसह मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

 

‘या’ ठिकाणी पावसाच्या कोसळधारा…

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट असून मुंबई, ठाणे, पालघर,
नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात पाऊस कायम आहे.

 

Web Title :- Maharashtra Rain Update | warning of rains in the state red alert in mumbai

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pratap Sarnaik | डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री; रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले – प्रताप सरनाईक

Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

Related Posts