IMPIMP

Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार; सर्वत्र खळबळ

by nagesh
Shinzo Abe | The former Japanese Prime Minister Shinzo Abe has been shot during a speech in the city of Nara

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात शिंजो आबे जखमी झाल्याचे समजते. बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आल्याचे तेथील स्थानिक पत्रकाराने सांगितलं. पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

घटनास्थळावरील एका व्यक्तीने सांगितले की, त्याने बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या आणि आबे (Shinzo Abe) यांना रक्तस्त्राव होत असल्याचे पाहिले. गोळी लागल्याने ते बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळू शकलेली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या दरम्यान, एका संशयिताला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितले आहे. या संशयितामध्ये आबे यांच्या भाषणादरम्यान मागून गोळी झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title :- Shinzo Abe | The former Japanese Prime Minister Shinzo Abe has been shot during a speech in the city of Nara

हे देखील वाचा :

Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह ठाणे, पालघरला ‘रेड अलर्ट’

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?

Pratap Sarnaik | डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री; रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले – प्रताप सरनाईक

Related Posts