IMPIMP

Chitra Wagh | भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड, मात्र चर्चा सुरु झाली पंकजा मुंडेंच्या हुकलेल्या संधीची

by nagesh
Chitra Wagh | chitra wagh elected as bjp womens wing president pankaja munde missed opportunity again political news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  भाजपने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपचा (BJP) आक्रमक चेहरा
म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड (BJP Mahila Morcha President) करण्यात आली
आहे. आतापर्यंत उमा खापरे (Uma Khapre) यांच्याकडे महिला मोर्चाची जबाबदारी होती. खापरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडील हा पदभार चित्रा वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या नावाची घोषणा करत नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. चित्रा वाघ गेल्या काही काळापासून महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडत आहेत. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांवेळी चित्रा वाघ हिरीरीने आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी मिळाली असली तरी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाने पुन्हा डावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात वाघ आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांनी संधी मिळाली असल्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी आपली नाराजी उघडपणे सूचक शब्दात व्यक्त केली होती.

 

 

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh elected as bjp womens wing president pankaja munde missed opportunity again political news

 

हे देखील वाचा :

Jayant Patil On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या जवळिकीच्या चर्चेचा जयंत पाटलांनीच लावला निकाल; म्हणाले – ‘सत्तारूढ पक्ष अशाप्रकारची…’

Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | राज्यातील 18 उप जिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती, पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने नियुक्त्या

Rain in Maharashtra | हिवाळा सुरु होताच राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुण्यासह इतर जिल्ह्यांत कसं असेल हवामान?

 

Related Posts