IMPIMP

Rain in Maharashtra | हिवाळा सुरु होताच राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुण्यासह इतर जिल्ह्यांत कसं असेल हवामान?

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  राज्यातून पाऊस परतला असून हिवाळा (Winter) सुरु झाला आहे. मात्र तरीही पाऊस (Rain in Maharashtra) पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही भागात थंडीची (Cold) चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र नोव्हेंबरमध्ये सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. त्यामुळे यंदा हिवाळ्यात देखील जोरादार पावसाचा (Rain in Maharashtra) अनुभव घेता येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक (Department of Meteorology Director General) डॉ. मृत्युंजय महापात्रा (Dr. Mrutyunjay Mohapatra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पाऊस (Rain in Maharashtra) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात सामन्य ते सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यामुळे दिवसाचे तापमान थंड आणि रात्रीचे तापमान जास्त उबदार होण्याची शक्यता आहे.

 

कोठे पडणार पाऊस?

हवामान खात्याच्या (Department of Meteorology) अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
पावसामुळे आकाश ढगाळ राहिल तर दिवसाचे तापमान थंड राहू शकते.
हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात दिवसाचे तापमान थंड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

पुण्यात कसे असेल हवामान?

ढगाळ वातावरणामुळे, महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात नोव्हेंबरमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थंड असेल तर रात्रीचे तापमान जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rain in Maharashtra | maharashtra weather forecast heavy rain in maharashtra in november know weather in pune mumbai

 

हे देखील वाचा :

इन्कम टॅक्स पेयरसाठी गुडन्यूज! आता ITR भरणं होणार आणखी सोपं

Pune Crime | बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जण ताब्यात

Imran Khan | पाकीस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, एका सहकाऱ्याचा मृत्यू; रॅली मध्ये घडली घटना

 

Related Posts