IMPIMP

Cloudburst Near Amarnath Cave | अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता

by nagesh
Cloudburst Near Amarnath Cave | 15 dead after cloudburst near amarnath cave

श्रीनगर : वृत्तसंस्था Cloudburst Near Amarnath Cave | अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली (Cloudburst Near Amarnath Cave) आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे जवळपास पंधरा जणांचा मृत्यू (Died) झाला आहे. तसेच 40 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अमरनाथच्या गुहेपासून 2 किमी अंतरावर ही ढगफुटी झाली आहे. यामुळे भाविकांचे तंबू वाहून गेले आहे. तसेच, तेथे बचाव मदतकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आम्ही ढगफुटीमुळे आलेले संकट आणि नुकसानीचे चित्र पाहिले. पण यात्रेमुळे आणि श्रद्धेमुळे आमचे मनोबल खचले नाही आणि आम्हाला प्रवास करायचा आहे. प्रशासनाने परवानगी दिली तर पुढे जाऊन दर्शन घ्यायचे आहे. असं तेथील काही भाविकांनी सांगितले. ढगफुटीच्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असावा, पण त्याबाबत आताच निश्चित असे काही सांगता येत नाही, अशी माहिती इंडोतिबेटियन पोलीस दलाच्या (Indo-Tibetan Police Force) अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ढगफुटीमुळे गुंफेच्या पायथ्यानजीकच्या यात्रातळावरील काही लंगर आणि तंबू यांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार (IG Vijayakumar) यांनी दिली.

 

दरम्यान, या घटनेनंतर अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आलीय.
एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफची (SDRF) टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे काही नांगर आणि तंबू जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे.
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Cloudburst Near Amarnath Cave | 15 dead after cloudburst near amarnath cave

 

हे देखील वाचा :

Maharashtra OBC Political Reservation | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच’

Modi Government On Edible Oil | खाद्य तेलाच्या किंमतीत 15 रुपयांची कपात करावी – केंद्र सरकार

Maharashtra Rain Update | राज्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरूच; अनेक जिल्ह्यांना IMD चा ‘अलर्ट’

 

Related Posts