IMPIMP

Modi Government On Edible Oil | खाद्य तेलाच्या किंमतीत 15 रुपयांची कपात करावी – केंद्र सरकार

by nagesh
Mustard Oil Price | mustard oil price today update in up uttar pradesh mustard oil fall know latest rate

नवी दिल्ली – वृत्तसंस्था Modi Government On Edible Oil | खाद्य तेलाच्या (Edible Oil) किंमतीत ताबोडतोब 15 रुपयांची कपात करण्याचे निर्देश केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government On Edible Oil) प्रमुख खाद्यतेल विक्रेत्या संघटनांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्पादक आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांकडून वितरकांना दिल्या जाणाऱ्या किंमतीतही कपात करण्यास सांगण्यात आले आहे. किंमती कमी झाल्याचा लाभ त्वरित ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (Department of Food and Public Distribution) सांगितलं आहे.

 

सरकारच्या म्हणण्यानुसार, आयात केलेल्या खाद्य तेलाच्या दरात घसरण होत असून हा खाद्यतेलाच्या बाबत अत्यंत सकारात्मक कल आहे. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाने त्यास अनुरुप अशा देशांतर्गत बाजारपेठेतही किंमती खाली येतील, याची सुनिश्चिती करण्याची गरज आहे. तेलाच्या किंमतीतील कपात ग्राहकांपर्यंत अत्यंत त्वरित आणि कसलीही टाळाटाळ न करता पोहोचवली पाहिजे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ज्या कंपन्यांनी अजूनही खाद्यतेलाच्या किंमती कमी केलेल्या नाहीत आणि त्यांचा कमाल किरकोळ दर अद्याप इतर ब्रँड्सपेक्षा अधिक आहे,
त्यांनाही सरकारने सल्ला दिला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) खाद्य तेलाचे दर घटले असताना
देशात खाद्य तेलाचे दर कसे कमी करता येतील याचा विचार करण्यासाठी सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने
देशातील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसह SEAI, IVPA, आणि SOPA या कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील महिन्यात विविध खाद्य तेलांचे दर प्रती टन 300-400 डॉलरने (USD) कमी झालेत.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा खाद्य तेलावरचा खर्च काही प्रमाणात कमी होणार असल्याचं दिसत आहे.

 

Web Title :- Modi Government On Edible Oil | edible oil prices should be reduced by rs 15 central modi government directs edible oil sellers associations

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्यां-चांदीचे दर

Maharashtra Rain Update | राज्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरूच; अनेक जिल्ह्यांना IMD चा ‘अलर्ट’

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना आदेश; म्हणाले – ‘माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको’

 

Related Posts