IMPIMP

CM Eknath Shinde | दिल्लीत दाखल होताच मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती, म्हणाले…

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराज्यातील महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळलं आणि शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला एक महिना होऊन गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर या मुद्यावरुन तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सतत दिल्ली दौऱ्यावरुन टीका करत आहेत. अशातच आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीला गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या दौऱ्याबाबत आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) प्रतिक्रिया दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात (Cultural Center) देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ सोहळ्यासाठी राष्ट्रीय समितीची बैठक (National Committee Meeting) होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. तर उद्या राष्ट्रीय नीती आयोगाची (NITI Aayog) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियोजीत बैठकांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याचा मंत्रिमंडळ विस्तारासोबत काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं

मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. विस्तार पुढच्या आठवड्यात होईल का ? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, पुढचा आठवडा कशाला ? लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde on delhi tour gave reaction on cabinet expansion

हे देखील वाचा :

Pune Crime | MPSC च्या गट क सेवा मुख्य परीक्षेत पुण्यात गैरप्रकार, ब्ल्यूटूथ इयरफोन जप्त; उमेदवारावर FIR

Kolhapur ACB Trap | पुण्यातील शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR; पोलीस दलात प्रचंड खळबळ

Pune Crime | पोलीस मित्र असल्याचे सांगून बलात्काराच्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी, तरुणाला लुबाडणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

Related Posts