IMPIMP

CM Eknath Shinde | ‘…तर मी निरोप घेईन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. महाराष्ट्रातील दीन दुबळ्या घटकांची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. माझ्यासोबत गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेचे (Shivsena) 40 आणि छोट्या पक्षांचे 10 आमदार (MLA) माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं त्यांचं अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मला आता हे वाटत नाही विश्वास बसत नाही, मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, कारण आज आपण पाहिलं महाराष्ट्रातील अनेक घटना पाहिल्या तर लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, नगरसेवक असतील. ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जातात. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला या घटनेची 33 देशांनी नोंद घेतल्याचं सांगितलं, अस एकनाथ शिंदे म्हणाले. सत्तेमध्ये मी नगरविकास मंत्री होतो. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उदय सामंत (Uday Samant) ही लोकं मंत्री होती. स्वत:चं मंत्रिपद डावावर लावून 40 आमदार आणि 10 आमदार होते. पुढं बलाढ्य सरकार, पुढं बसलेली मोठी माणसं असताना दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आणि दिघेंचा सैनिक होतो, आम्ही कुठं जातोय याबद्दल कुणी विचारलं नाही, असं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

माझं खच्चीकरण करण्यात आलं

मला ज्या पद्धतीनं वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार हे आमदार आहेत आणि पुढे बसलेले आमदार आहेत.
अन्याय झाल्यानंतर ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणं बंड आणि उठाव केला.
आमच्या आमदारांनी मला विचारलं नाही की मुख्यमंत्र्यांना भेटून पुढं जाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही, सुनील प्रभू यांना देखील माहिती आहे की कशा प्रकारे खच्चीकरण करण्यात आलं.
मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही अजिबात चिंता करु नका, तुमच्या निवडणुकीची, तुमचं नुकसान होत असेल असं वाटत असेल तर मी निरोप घेईन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

बेकायदेशीरपणे गटनेते पदावरून हटवले

मला बेकायदेशीरपणे गटनेते पदावरून हटवण्यात आले. पुतळे जाळण्यात आले.
मी 30 ते 35 वर्षे रक्ताचं पाणी केलं आहे. मी 17 व्या वर्षी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं भारावलो होतो.
आनंद दिघेंची (Anand Dighe) भेट झाली आणि शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मी 1997 ला नगरसेवक झालो, दिगंबर धोत्रे (Digambar Dhotre) हा तिथला भाजपचा कार्यकर्ता होता मी त्याला 1992 ला तिकीट देण्यात आलं मी पाच वर्ष थांबलो.
शाखाप्रमुख पदापासून काम सुरु केलं, मी पदाचा विचार केला नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde said which thing told to rebel mlas during maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

 

Related Posts