IMPIMP

CM Eknath Shinde | ‘नथुराम’च्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, शरद पोंक्षेंनी CM शिंदेंसमोर सांगितल्या अनेक आठवणी

by nagesh
CM Eknath Shinde | marathi actor sharad ponkshe maharashtra cm ekanth shinde diwali pahat nathuram godse balasaheb thackeray in thane

ठाणे :  सरकारसत्ता ऑनलाइन बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) आणि त्यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब ठाकरे ठाकमपणे ‘नथुराम गोडसे’च्या (Nathuram Godse) पाठीमागे उभे होते, अशा आठवणी आज
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी मांडल्या. ठाण्यातील
गडकरी रंगायतन (Gadkari Rangayatan) येथे ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
शरद पोंक्षे उपस्थित होते. यावेळी पोंक्षे यांनी बाळासाहेबांनी सामनामध्ये लिहिलेल्या एका अग्रलेखाची सुद्धा आठवण काढली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पोंक्षे म्हणाले, कोरोनाच्या काळात 2021 मध्ये माझ्या आयुष्यातील पहिले पुस्तक ‘मी आणि नथुराम’ प्रकाशित झाले. ‘मी नथुराम गोडसे’ नाटक करत असताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ठामपणे नथुरामच्या पाठीशी उभे राहिले होते. 17 जुलै 1998 रोजी त्यांनी ‘नथुराम बोलला तर काँग्रेसच्या (Congress) पोटात का दुखतं?’ असा अग्रलेख ‘सामना’त लिहिला होता. तो अग्रलेख या पुस्तकात छापण्यात आला आहे.

 

ती बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांचे आजचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आहेत.
हे खर्‍या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. पुस्तकात आनंद दिघे (Anand Dighe) कसे पाठीशी उभे राहिले,
बाळासाहेबांनी ती लढाई कशी लढली आणि हे नाटक केंद्र सरकारविरोधातील लढाईत कसे जिंकले याचे अनेक किस्से आहेत.
पोंक्षे म्हणाले, मी काही लेखक नाही, त्यामुळे माझे पुस्तक कोणी वाचेल असे वाटले नव्हते. पण हे बेस्ट सेलर पुस्तक ठरले. दिवाळीपर्यंत 10 आवृत्त्या संपल्या आहेत.

 

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपले सगळे काही उघड असते.
कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत, पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले.
त्याचा आवाज आजही घुमतोय. आमचे हितचिंतक आजही त्या फटक्याच्या आवाजांचे डेसिबल मोजत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde | marathi actor sharad ponkshe maharashtra cm ekanth shinde diwali pahat nathuram godse balasaheb thackeray in thane

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

Pune Crime | दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव; कर्वेनगरमधील बंगल्यातून लांबविले ८ लाखांचे दागिने

Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी सत्ता आणली पण ते रामराज्य आणू शकले नाहीत – एकनाथ खडसे

 

Related Posts