IMPIMP

Pune Crime | दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव; कर्वेनगरमधील बंगल्यातून लांबविले ८ लाखांचे दागिने

by nagesh
Pune Crime News | Not even the police, their houses are safe; Burglary by burglars by entering the police line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) पुजेसाठी त्यांनी देवघरात ७ लाख ९३ हजार रुपयांचे दागिने (Gold Jewelry) ठेवले होते. विधीवत पुजन केल्यानंतर ते कुटुंब झोपी गेले. परंतु, बंगल्यातील स्वयंपाक घराच्या पाठीमागील दरवाजा चुकून उघडा राहिला आणि चोरट्याने डाव साधत दागिन्यांवर डल्ला मारला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत गौरांग होनराव Gaurang Honrao (वय ३०, रा. आदित्य बंगला, पुणे विद्यापीठ सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. होनराव या आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी कर्वेनगरला राहतात. दिवाळीनिमित्त त्यांचे मामा, मामी, दोन मुली शिकागो येथून दिवाळीसाठी पुण्यात आले आहेत. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने घरी आणले होते. शनिवारी (२२ ऑक्टोबर) होनराव यांनी देवघरात पूजेसाठी दागिने मांडले होते. विधीवत पूजन केल्यानंतर होनराव कुटुंबीय रात्री झोपले. स्वयंपाकघरातील मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. दरवाजा बंद करण्यास होनराव विसरल्या. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी देवघरातून ७ लाख ९३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. (Pune Crime)

 

सकाळी आजी उठल्यानंतर हा प्रकार समोर आला.
चोरट्यांनी होनराव यांच्या बंगल्यातून २२६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ५० ग्रॅम चांदीचे दागिने लांबविले.
पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांच्या शोध घेण्यात येत असून पोलिसांकडून (Pune Police) परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Forgot to lock the door and the thief made a plan; Jewelery worth 8 lakhs was recovered from a bungalow in Karvenagar

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी सत्ता आणली पण ते रामराज्य आणू शकले नाहीत – एकनाथ खडसे

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! १३ महिन्याच्या चिमुकलीवर केला अत्याचार; शिवणे येथील घटना

Pune Fire News : लक्ष्मी पूजनाला फटाक्यांच्या अतिषबाजीने सहा ठिकाणी आगीच्या घटना, बी टी कवडे रस्त्यावर 8 दुचाकी जळाल्या

 

 

Related Posts