IMPIMP

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  –  परतीच्या पावसाने राज्यात (Rain in Maharashtra) धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडले. ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दगडाला पाझर फुटला नाही म्हणूनच 50 आमदार फुटले अशा शब्दात दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

 

आमच्या काळात एनडीआरएफचे निकष (NDRF Criteria) बदलले होते. त्यावेळी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घरी बसून संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसेल, तर आम्ही त्यांना भाग पाडू. आमच्यासाठी सत्तेसाठी गद्दारी केली पण बळीराजाशी गद्दारी करु नका. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडू. प्रसंगी मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

 

 

दगडाला पाझर फुटला नाही…

 

उद्धव ठाकरे यांच्या टीकाले प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच 50 आमदार फुटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना (Shiv Sainik) साध्या भेटी दिल्या असत्या, तसेच जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड झालं असतं का?, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

 

 

आमची दु:ख आमच्या हृदयात

 

दिपक केसरकर पुढे म्हणाले, आम्ही कुणावर टीका करत नाही. फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही. त्यासाठी कामं करावी लागतात. आमची दु:ख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करुन दाखवू असं केसरकर म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजपसोबत आमची घट्ट मैत्री

 

शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, शिंदे गटाचे 22 नाही तर 50 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.
भाजपसोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही,
असा खोचक टोला त्यांनी लगावला.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | shinde group minister deepak kesarkar has criticized former chief minister uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

Pune Crime | दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव; कर्वेनगरमधील बंगल्यातून लांबविले ८ लाखांचे दागिने

Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी सत्ता आणली पण ते रामराज्य आणू शकले नाहीत – एकनाथ खडसे

 

Related Posts