IMPIMP

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

by nagesh
Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाइन  – अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. तर दुसरीकडे
सत्ताधारी पक्ष ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत चालली आहे. शेतकर्‍यांसह सर्वच विरोधी पक्षांनी ओला दुष्काळ (Wet
Drought) जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकार (State Government) निर्णय घेत नाही असे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केल्याने सत्ताधारीच त्यांच्यावर टीका करत
असल्याचे चित्र महाराष्ट्रात प्रथमच पहायला मिळत आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सुद्धा यासंदर्भात मागणी
केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना खोचक प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले (Nana Patole) नागपुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, हे भाष्य हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात मोठे बहुमत असलेले भक्कम पाठिंब्याचे सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत आम्ही 72 मोठे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

 

मुख्यमंत्री म्हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) भाजपा (BJP) 397 जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb’s Shiv Sena) गटाला 243 जागा मिळाल्या. इतरही येऊन भेटत आहेत. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष बोलतच असतो. विरोधी पक्ष टीका करत आहेत. पण त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ.

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, परतीच्या पावसाच्या (Rain in Maharashtra) नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले जाणार नाही. हे बळीराजाचे सरकार आहे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे आहे. एनडीआरएफच्या (NDRF) नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसान भरपाई आम्ही दिलेली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title: Nana Patole | Chief Minister’s rude reply to Nana Patole, said – this demand is ridiculous, it is only because of the fear of the opponents…

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव; कर्वेनगरमधील बंगल्यातून लांबविले ८ लाखांचे दागिने

Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी सत्ता आणली पण ते रामराज्य आणू शकले नाहीत – एकनाथ खडसे

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! १३ महिन्याच्या चिमुकलीवर केला अत्याचार; शिवणे येथील घटना

Pune Fire News : लक्ष्मी पूजनाला फटाक्यांच्या अतिषबाजीने सहा ठिकाणी आगीच्या घटना, बी टी कवडे रस्त्यावर 8 दुचाकी जळाल्या

 

Related Posts