IMPIMP

CM Eknath Shinde | राज्यात पोलीस आणि अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार

by nagesh
Eknath Shinde | Uddhav Thackeray's mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde - Jayakumar Gore

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन पोलीस, अग्निवीर भरतीसाठी (Police, Agniveer Recruitment) येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय
जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांना पत्र दिले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब
कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी
होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत (District Administration) जिल्हा परिषद (Zilla Parishad) किंवा महापालिका शाळांमध्ये (Municipal
School) या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अग्निवीर भरतीसाठी चाचणी दरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर
भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.
त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही
यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

 

Web Title :- CM Eknath Shinde | The state government will make the arrangements for those participating in Agniveer and police recruitment in the state

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

Pune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार – माधव जगताप

Pune Ganeshotsav 2022 | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात ‘या’ दिवशी मद्य विक्री बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

Related Posts