IMPIMP

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Doctor in Corona's lap too! Possibility of impact on healthcare in Mumbai, 305 doctors in the state infected with corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 653 इतकी झाली असून 259 जण ओमिक्रॉन मुक्त झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यात आजपर्यंत 65 लाख 18 हजार 916 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.86 टक्के झाले आहे. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 573 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.1 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 95 लाख 09 हजार 260 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 67 लाख 30 हजार 494 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.68 टक्के आहे. सध्या 66 हजार 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील 10 दिवसांतील रुग्ण वाढ

25 डिसेंबर – 1485 रुग्ण

26 डिसेंबर – 1648 रुग्ण

27 डिसेंबर – 1426 रुग्ण

28 डिसेंबर – 2172 रुग्ण

29 डिसेंबर – 3900 रुग्ण

30 डिसेंबर – 5368 रुग्ण

31 डिसेंबर – 8067 रुग्ण

1 जानेवारी – 9170 रुग्ण

2 जानेवारी – 11,877 रुग्ण

3 जानेवारी – 12, 160 रुग्ण

आज (4 जानेवारी) – 18,466 रुग्ण

 

Web Title: Coronavirus in Maharashtra | Worrying! Big increase in corona patients in the state! 18,466 new patients in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

Ajit Pawar | पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के, अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

 

Related Posts