IMPIMP

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

by nagesh
Ajit Pawar | Ajit Pawar's directive to impose fine of Rs.500 without mask and Rs.1000 for spitting in public

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनापासून बचावासाठी मास्कचा (Mask) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड (Fine) तर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड आकारण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात दिले आहेत. तसेच या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा N95 मास्कचा वापर करावा, इतर प्रकारचे मास्क सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये कोरोनाबाधित (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या
पार्श्वभूमीवर पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये (Council Hall) घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या
निर्णयाची माहिती देताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील 1 ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग बंद (School Close) करण्याचा
महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच 9 चे वर्ग सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 1 ली ते 8 वी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरु राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar’s directive to impose fine of Rs.500 without mask and Rs.1000 for spitting in public

 

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के, अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

Restrictions in Maharashtra | राज्यात निर्बंध वाढणार? अजित पवारांनी सांगितलं…

Pune Crime | एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नागरिकाची फसवणूक, 3 जणांवर FIR

Gold Price Today | सोन्याची घसरण सुरूच, चांदीची चमक सुद्धा उतरली, जाणून घ्या आजचा नवीन दर

 

Related Posts