IMPIMP

Corporator Pramod Bhangire | जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद

by nagesh
Corporator Pramod Bhangire | Great response of women to the program organized by corporator Pramod Bhangire on the occasion of International Women's Day

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCorporator Pramod Bhangire | पुणे महानगरपालिकेचे (Pune Corporation) शिवसेना नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या विशेष प्रयत्नांतून व स्वखर्चाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक (Punyashlok Ahilyabai Holkar Chowk) व धर्मवीर आनंद दिघे साहेब वाचनालयाचे (Dharmaveer Anand Dighe Saheb Library) उद्घाटन माजी राज्यमंत्री पुणे जिल्हा शिवसेना (Shivsena) संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सहभागी झालेल्या भाग्यवान एका महिलेला सुमारे 11 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट गावामध्ये विकास कामाचा आढावा आपल्या भाषणात सांगितला.
शिवसेना 80 टक्के समाजकारण 20 राजकारण करते या पुढच्या काळात शिवसेना पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकावल्या शिवाय शांत बसणार नाही व हडपसर विधानसभा मतदारसंघात (Hadapsar Assembly Constituency)
10 पेक्षा अधिक शिवसेनेचे नगरसेवक कसे निवडून येतील या साठी प्रयत्नशील राहणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.
गुडघ्याला बाशिंग बांधून शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेल्यांना आता शिवसेना पक्षाचा विसर पडला आहे, असा विरोधकांना टोला त्यांनी लगावला.
जागतिक महिला दिनानिमित्ताने (World Women’s Day) मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे आभार भानगिरे यांनी मानले.

 

या पुढच्या काळात पुणे महानगरपालिकेवर कसा भगवा फडकणार यांची जबाबदारी तुमची माझी आणि शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची राहील व पुणे महानगरपालिका मध्ये एक महत्त्वाचे पद व जबाबदारी मी भानगिरे यांना त्यांच्या विकास कामाचा धडाका पाहून देणार अशी ग्वाही माजी राज्यमंत्री पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या कार्यक्रमाच्या वेळी लहान मुलींनी माँसाहेब जिजाऊच्या लेकी या पथनाट्याचे सादरीकरण केले.
सर्व महिलांनी शपथ घेतली की, यापूर्वी आम्ही नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या पाठीशी होतो आणि यापुढे ही राहणार.
येणाऱ्या निवडणूकीच्या (Election) काळात शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यासहित त्यांच्या बरोबर उभे राहणाऱ्या सर्व शिवसेनेचे नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून देणार.

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपा (BJP) महिला पदाधिकारी अयोध्या बबन आंधळे यांनी अनेक महिलांसह व इतर पक्षातील महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपस्थित पुणे शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे (Pune city Shiv Sena president Sanjay More), नगरसेवक विशाल धनवडे (Corporator Vishal Dhanwade),
विजय देशमुख (Vijay Deshmukh), हवेली पंचायत समिती सदस्य राजू भाडळे (Haveli Panchayat Samiti Member Raju Bhadale), गणेश शिंदे, सरपंच प्रज्ञा झांबरे (Sarpanch Pragya Jhambre),
बाळासाहेब भानगिरे, तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर, अभिमन्यू भानगिरे, उल्हास तुपे, देवेंद्र भाट, नितीन गावडे, शाश्वत घुले,
वैष्णवी घुले, डाळीबकर, वैशाली काळे, म्हेत्रे, नाईक,
जेष्ठ नागरिक व सर्वच शिवसेना महिला पदाधिकारी पुणे शहर हडपसर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, सोसायटी नागरिक,
महिला मुली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांचे आभार सचिन तरवडे यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रमोद भानगिरे आयोजक टीमने केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Corporator Pramod Bhangire | Great response of women to the program organized by corporator Pramod Bhangire on the occasion of International Women’s Day

 

हे देखील वाचा :

Neha Malik Superhot Photos | भोजपुरी चित्रपटातील ‘ही’ सुपरबोल्ड अभिनेत्री आपल्या हॉट फोटोनं चाहत्यांना करते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Shivendra Raje Bhosale | ‘उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना फक्त डोंबाऱ्याचा खेळ येतो’- शिवेंद्रराजे भोसले

Bombay High Court | ‘…हे राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं नाही का?’, उच्च न्यायालयानं भाजप आमदार गिरीश महाजनांना फटकारलं

 

Related Posts