IMPIMP

Corporator Tushar Kamathe | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तिसरा झटका ! नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा

by nagesh
Corporator Tushar Kamathe | Third blow to BJP in Pimpri Chinchwad Corporator Tushar Kamthe resigns

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Tushar Kamathe | आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Elections) पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) एकामागून एक झटके बसत आहे. भाजपच्या वसंत बोराटे (Vasant Borate) आणि चंदा लोखंडे (Chanda Lokhande) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता तुषार कामठे (Corporator Tushar Kamathe) यांनी राजीनामा (Resignation) दिला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Assembly Constituency) पिंपळे निलखचे (Pimple Nilakh) प्रतिनिधीत्व करणारे तुषार कामठे यांनी आज (शुक्रवारी) भाजप नगरसेवकपदाचा (Corporator) राजीनामा दिला. कामठे यांनी राजीनामा दिल्याने भाजपला हा तिसरा मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कामठे यांनी चिंचवड ऑटो क्लस्टर (Chinchwad Auto Cluster) येथे आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. आमदारांच्या (MLA) हुकूमशाहीमुळे राजीनामा देत असल्याचे कामठे यांनी सांगितले. तसेच अत्यंत चुकिच्या पद्धतीने कामे केली आणि महापालिका लुटली असा आरोप त्यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे. कामठे यांनी राजीनामा दिला त्यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे कामठे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Corporator Tushar Kamathe)

 

तुषार कामठे हे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर पिंपळेनिलख येथून निवडून आले होते. मागील पाच वर्षात पक्षाकडून त्यांना एकही पद मिळाले नाही. त्यांनी वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या (Corruption) मुद्यावरुन आवाज उठवला होता. तसेच भाजपच्या चुकीच्या कामाविरुद्ध आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती.

 

Web Title :- Corporator Tushar Kamathe | Third blow to BJP in Pimpri Chinchwad Corporator Tushar Kamthe resigns

 

हे देखील वाचा :

BJP Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; नवाब मलिकांच्या अटकेनंतर केलेलं कृत्य पडलं महागात

Nawab Malik | ‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध 3 वर्षापूर्वीच ईडीकडे तक्रार, पण अद्याप…’

Pune Crime | पत्नीला नांदविण्यासाठी आणायला गेलेल्या पतीला मेव्हण्यांनी केली बेदम मारहाण; खडकीतील अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी परिसरातील घटना

 

Related Posts