IMPIMP

Corporator Vasant More | नगरसेवक वसंत मोरे यांच्या एका Facebook पोस्टमुळं जखमी चेतनच्या मदतीसाठी एका रात्रीत जमा झाले 14 लाख (व्हिडिओ)

by nagesh
Corporator Vasant More | MNS Corporator Vasant More s facebook post and rs 14 lakh deposited for the treatment of chetan who is struggling with death

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Corporator Vasant More | काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुंढवा (Mundhwa Pune) परिसरात रस्त्यावरुन पायी जात असताना 40 फूट उंचावरुन पडलेली लोखंडी सळई चेतन महेश गाढवे Chetan Mahesh Gadhve (वय-12 रा. साईपार्क, मुंढवा) या मुलाच्या डोक्यात घुसली. यामध्ये चेतन गंभीर जखमी झाला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पुण्यातील नोबेल रुग्णालयात (Nobel Hospital) उपचारासाठी दाखल केल. चेतनच्या उपचारासाठी खूप खर्च येणार असल्याने आणि चेतनच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांना उपचाराचा खर्च कसा जमा करायचा असा प्रश्न पडला होता. त्याचवेळी मनसेचे पुण्यातील नगरसेवक (MNS Corporator) वसंत मोरे (Vasant More) हे गाढवे कुटुंबासाठी देवतूतासारखे धावून आले. वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) लिहून चेतनच्या उपचारासाठी मदत (Help) करण्याचे आवाहन केले अन् हजारो हात पुढे सरसावले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंढवा परिसरात 28 डिसेंबर रोजी चेतन दुपारी एकच्या सुमारास रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी इमारतीवर केबल ओढण्याचे काम सुरु होते. काही समजण्याच्या आतच वरुन एक लोखंडी सळई थेट चेतनच्या डोक्यात घुसली. काही क्षणात तो खाली कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

 

 

जखम खोलवर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागणार आहे. मात्र, यासाठी खर्चही खूप असल्याने आणि घरची परिस्थीती जेमतेम असल्याने चेतनवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया लांबली. ही माहिती मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More) यांना समजली. त्यांनी लगेच रुग्णालयात जाऊन चेतनच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी चेतनच्या वडिलांना मदत करावी यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहून आवाहन केले.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वसंत मोरे यांनी केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
चेतनच्या वडिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होऊ लागले आणि एका दिवसात तब्बल 14 लाख रुपये जमा (RS 14 Lakh Deposited) झाले.
अशी माहिती वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन दिली आहे.
मुलाच्या उपचारासाठी एका दिवसात पैसे जमा झाल्याने चेतनच्या वडिलांनी वसंत मोरे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

 

 

वसंत मोरे यांनी चेतनच्या वडिलांचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.
यामध्ये चेतनचे वडिल म्हणतात, मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहित आहे, पण हा देव माणूस माहीत नव्हता.
मी या देव माणसाला आयुष्यभर कधीच विसरणार नाही.
या दुनियेत कुणी कुणाला दोन रुपये देत नाही, पण या देवाच्या एका शब्दामुळे उपचारासाठी 12 लाख रुपये जमा झाले.
असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

 

Web Title :- Corporator Vasant More | MNS Corporator Vasant More s facebook post and rs 14 lakh deposited for the treatment of chetan who is struggling with death

 

हे देखील वाचा :

Skin Itching Problems | ‘या’ विशेष उपायांनी खाज सुटणे क्षणात होईल दूर; जाणून घ्या

CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

PM Narendra Modi | देशात पुन्हा लॉकडाउन लागणार? PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

 

Related Posts