IMPIMP

CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला

by nagesh
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – CNG Rate Hike in Pune | गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे (Fuel) दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. दरम्यान मागील काही दिवसांपासून थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सीएनजी (CNG) वाहन वापरत असलेल्यांना आता दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. गरूवारी (13 जानेवारी) रोजी सीएनजी दोन रुपये 10 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पुणे शहरात (Pune News) एक किलो सीएनजीसाठी 66.00 रुपये द्यावे लागणार आहे. (CNG Rate Hike in Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नोव्हेंबर 2021 नंतर झालेली या वर्षातील ही पहिली किंमतवाढ आहे. याआगोदर ऑगस्ट महिन्यात सीएनजी 4 रुपये 60 पैशांनी महागला होता. 4 आणि 14 ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे 2 आणि 2.6 रुपयांनी सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. तर, एकदाच महिन्यात 4 रुपयांनी दरवाढ झाल्याची ती पहिलीच घटना होती. दिवाळीमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला नसला तरी सीएनजीच्या (CNG) किंमतीत वाढ होत आहे. (CNG Rate Hike in Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचे (13 जानेवारी) दर :

पेट्रोल – 109.50

पॉवर पेट्रोल – 113.50

डिझेल – 92.50

सीएनजी – 66.00 (प्रतिकिलो)

 

Web Title :-  CNG Rate Hike in Pune | cng price has been hiked by rs 2 per kg again in pune

 

हे देखील वाचा :

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

PM Narendra Modi | देशात पुन्हा लॉकडाउन लागणार? PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल 50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

Omicron च्या धोक्यादरम्यान Bus किंवा Auto ने प्रवास करत असाल तर व्हा सावध ! कोरोनाचा धोका ‘या’ 6 पद्धतीने करा कमी

 

Related Posts