IMPIMP

Covid-19 Death | कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार नाही

by nagesh
Covid-19 Death | center not responsible for corona vaccine deaths governments affidavit in supreme court

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – कोरोना लस (Covid-19 Death) दिल्यानंतर तब्येतीत बिघाड होऊन झालेल्या मृत्यूची जबाबादारी घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. आम्हाला मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. परंतु, लसीकरणानंतर (Covid-19 Death) कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

 

मागील वर्षी लसीकरणानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. या मुलींच्या पालकांनी केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने कथित मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लसीकरणाचे होणारे दुष्परिणाम वेळेत शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन्याचे आदेश देखील देण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस द्वारे केंद्राकडे उत्तर मागितले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लसीच्या प्रतिकूल परिणामाने होणाऱ्या मृत्यूला केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य होणार नाही.
लसीमुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या पालकांनी दिवाणी न्यायालयात खटला दाखल करुन भरपाईची मागणी करावी.
लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला शारीरीक दुखापत झाल्यास,
कायद्यानुसार तो व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबिय नुकसान भरपाईचा दावा दिवाणी न्यायालयात करु शकतात,
असे आरोग्य मंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.

 

Web Title :- Covid-19 Death | center not responsible for corona vaccine deaths governments affidavit in supreme court

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत का?, संजय राऊतांचा खोचक सवाल

Yami Gautam | यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

 

Related Posts