IMPIMP

Covid 19 Fourth Wave In India | सावधान ! भारतात चौथ्या लाटेची चाहूल, महाराष्ट्रात 24 तासात 4000 नवीन केस, तर देशात 12 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

by nagesh
Covid 19 Fourth Wave In India | attention coronavirus fourth wave in india more than 12 thousand new cases surfaced in 24 hours covid 19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Covid 19 Fourth Wave In India | कोरोनाच्या चौथ्या लाटेने भारतात जवळपास दार ठोठावले आहे (Coronavirus In India). नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 12 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोरोना केसेसने 10 हजारांचा आकडा पार केला आहे. (Covid 19 Fourth Wave In India)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या 24 तासात भारतात 12,213 नवीन रुग्ण आढळले. यासोबत, 58,215 अ‍ॅक्टिव्ह केस झाल्या आहेत, ज्या एकूण प्रकरणांच्या सुमारे 0.13 टक्के आहेत. रिकव्हरी रेट दिलासा देणारा आहे.

 

सध्या देशात 98.65 टक्के दराने लोक बरे होत आहेत. मात्र, त्यातही अलीकडच्या काळात घट झालेली दिसून येत आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर देशातील एकूण 7624 लोकांनी या महामारीवर मात केली आहे. (Covid 19 Fourth Wave In India)

 

महाराष्ट्रात 4000 हून अधिक प्रकरणे 
एकट्या महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे 4,024 नवीन रुग्ण आढळले असून या कालावधीत दोघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आरोग्य बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली. (Coronavirus in Maharashtra)

 

या नवीन प्रकरणांसह, राज्यातील एकूण बाधितांची संख्या 79,19,412 झाली असून मृतांची संख्या 1,47,877 झाली आहे. दरम्यान, 3,028 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून यामुळे आतापर्यंत महामारीतून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 77,52,304 वर गेली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

महाराष्ट्राच्या रिकव्हरी दरात सुद्धा लक्षणीय घट झाली आहे, जी 97.89 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.86 टक्के आहे.
आतापर्यंत राज्यभरातून 8,14,28,228 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी 79,19,412 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत, म्हणजेच 9.73 टक्के.

दिल्लीत 1,375 नवीन प्रकरणे, संसर्ग दर 7.01 टक्के 
बुधवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,375 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्ग दर 7.01 टक्के होता.
येथील आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. (Coronavirus in Delhi)

 

मात्र, संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे एकही प्रकरण समोर आले नाही. विभागाने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये म्हटले आहे
की बुधवारी नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 19,15,905 झाली आहे. मृतांची एकूण संख्या 26,223 आहे.

 

Web Title :- Covid 19 Fourth Wave In India | attention coronavirus fourth wave in india more than 12 thousand new cases surfaced in 24 hours covid 19

 

हे देखील वाचा :

Sangli ACB Trap | 1 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | सोशल मीडियावरील मित्रांनी जेजुरीला जाण्यासाठी बोलावून केला मुंबईतील 30 वर्षाच्या तरूणीवर बलात्कार

Pune Crime | पुनावळे येथील फॉर्म हाऊसवर रंगला होता जुगार ! 11 जणांवर कारवाई, 10 लाखांचा माल जप्त

 

Related Posts