IMPIMP

Cryptocurrency | ‘या’ 6 नाण्यांनी गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका दिवसात झाला 2,340.75% पर्यंतचा फायदा

by nagesh
Cryptocurrency | cryptocurrency 6 crypto coins gain up to 234075 pc in a day check details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मार्केट मागील काही आडवड्यांपासून वेगाने धावत आहे. यामध्ये बिटकॉईन (Bitcoin) आणि ईथर (Ether) नवीन उच्च स्तरावर पोहचले आहेत. शीबा इनू (Shiba inu) सारखे मेमेकॉईन वेगाने लोकप्रिय होत आहे आणि स्क्वीड गेम (Squid Game) सारखे टोकन वेगाने प्रसिद्ध होत चालले आहे. मंगळवार, 2 नोव्हेंबरला जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बिटकॉईन मागील 24 तासात 2.13 टक्के वाढले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मंगळवारी एका बिटकॉईनची किंमत 63,373.88 डॉलर होती, तर त्याचे मार्केट कॅप 1,194,135,564,973 डॉलर होते. इथेरियम म्हणजे ईथर सुद्धा 3.12 टक्के वाढले. एका ईथरच्या नाण्याची किंमत 4,460.05 ठरवली होती.

 

BTC ची किंमत 6 अंकापर्यंत पोहचली

 

WazirX ट्रेड डेस्कचे एक प्रवक्त्याने सांगितले की, बिटकॉईन 61K ते 62K च्या स्तरासोबत वाटचाल करत आहे. अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर्षाच्या अखेरपर्यंत BTC ची किंमत 6 अंकापर्यंत पोहचेल. महत्वाचे म्हणजे बिटकॉईनचे बाजार भांडवल 01 नोव्हेंबर 2021 ला काही तासातच 1.13 ट्रिलियन डॉलरवरून वाढून 1.17 ट्रिलियन डॉलर झाले. (Cryptocurrency)

 

या करन्सीची होती शानदार कामगिरी

 

क्रिप्टोकरन्सी बाजारासाठी मागील 24 तास खुप आश्चर्यकारक होते. बाजार भांडवलीकरणाद्वारे सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईनने कोणतेही महत्वाचे पाऊल उचलले नाही. पोलकाडॉट (DOT) ने 15% पेक्षा जास्तीची वाढ केली तर पॅराचिन्स डीओटी पारिस्थिती तंत्राच्या जवळ आले. जागतिक क्रिप्टो ट्रेडिंग फर्म मुड्रेक्सचे सीईओ आणि सह-संस्थापक एडुल पटेल यांनी म्हटले, याच्या समर्थकांकडून खरेदीचा जोश कायम ठेवल्यानंतर सुद्धा शीबा इनु अस्थिर राहिले. (Cryptocurrency) पोलकाडॉट मागील 24 तासात 14.16 टक्केच्या तेजीसह व्यवहार करत आहे. CoinMarketCap च्या आकड्यांनुसार, पोलकाडॉटच्या एका युनिटची किंमत 50.93 डॉलर होती.

 

क्रिप्टो मार्केटमध्ये आली तेजी

 

दरम्यान, मागील 24 तासात जागतिक क्रिप्टो मार्केटमध्ये 2.09 टक्केची वाढ दिसून आली. मार्केट कॅप मंगळवारी 1612 IST वर 2.71 होते. अशाप्रकारे, मागील 24 तासात एकुण क्रिप्टो बाजाराची मात्रा 136.88 बिलियन होती. CoinMarketCap च्या आकड्यांनुसार, हे मागील दिवसाच्या तुलनेत 0.57 टक्के जास्त होते. एकुण क्रिप्टो मार्केट कॅप 2.63 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Top 6 क्रिप्टोकरन्सी गेनर

 

Elonomics :

 

24.17 – मागील 24 तासात 2,340.75 टक्के वाढ.

 

UNITED EMIRATES DECENTRALIZED COIN :

 

0.4466 – मागील 24 तासात 1024.27 टक्के वाढ.

 

Melalie :

 

0.1288 – मागील 24 तासात 630.28 टक्के वाढ

 

GreenMonZilla :

 

0.00000004796 – मागील 24 तासात 330.66 टक्के वाढ

 

OOGI :

 

0.0035 – मागील 24 तासात 263.34 टक्के वाढ.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

डॉगस्वॅप :

 

171.66 – मागील 24 तासात 213.53 टक्के वाढ.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Cryptocurrency | cryptocurrency 6 crypto coins gain up to 234075 pc in a day check details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime | CID मालिका पाहून 2 अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षाच्या महिलेचा खुन ! सिंहगड रोड पोलिसांकडून ‘पर्दाफाश’, जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

IBPS Recruitment 2021 | ‘या’ 11 सरकारी बँकांमध्ये निघाली 1828 पदांसाठी SOची बंपर व्हॅकन्सी, इथं करा अप्लाय

Pune Crime | पुण्यात स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये मागणार्‍यावर खंडणीचा गुन्हा

 

Related Posts