IMPIMP

Pune Crime | CID मालिका पाहून 2 अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षाच्या महिलेचा खुन ! सिंहगड रोड पोलिसांकडून ‘पर्दाफाश’, जाणून घ्या संपुर्ण स्टोरी

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड परिसरामध्ये 30 ऑक्टोबर रोजी शालीनी बबन सोनवणे Shalini Baban Sonawane (वय-70) या महिलेचा खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा (Pune Crime) तपास करत असताना सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) लहान मुलांकडे केलेल्या चौकशीत आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन (Minor) मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी महिलेच्या घरातून चोरलेली रोख रक्कम (Cash) आणि सोन्याचे दागिने (Gold jewelry) जप्त केले. धक्कादायक बाब म्हणजे तब्यात घेण्यात आलेली मुले 16 आणि 14 वर्षांची असून त्यांनी सीआयडी मालिका (CID serial) पाहून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी घरातील कपाट उघडे असल्याने चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
सिहंगड रोड पोलीस ठाण्यातील (Sihangad Road Police Station) तपास पथकाने आरोपींचा शोध सुरु केला.
परंतु घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.

 

असा झाला उलगडा

 

दरम्यान मंगळवारी (दि.2) तपास पथकाचे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी (Ujjawal Mokashi) यांनी घटनास्थळाजवळ असलेल्या रोकडोबाबा मंदिराजवळ खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली.
त्यावेळी मुलांनी सांगितले की, 30 ऑक्टोबर रोजी पाणीपुरी खायला जात असताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने घरी गेले.
त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन मुले गडबडीने जात असल्याचे दिसून आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी 16 आणि 14 वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी न गडबडता आणि चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
याचवेळी एकाला घरात चोरी करण्याची सवय असल्याची माहिती मिळाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

आरोपींकडून धक्कादायक खुलासा

 

अल्पवयीन मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक माहिती दिली.
आरोपींचे मयत शालीनी बबन सोनवणे यांच्या घरात नेहमी येणेजाणे होते व मयत महिलेकडे कायम खुप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती होती.
सुमारे दोन महिन्यापुर्विच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी (Theft) करण्याचा कट रचुन घराची चावी चोरली होती.
परंतु मयत या वयस्कर असल्याने त्या घर सोडुन कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती.
त्यानंतर त्यांनी घरात शालीनी या एकटया असताना घरात जावुन चोरी करण्याची योजना आखली तसेच मयत महिलेने विरोध केला तर त्यांना मारण्याची ही तयारी केली होती, अशी माहिती आरोपींनी दिली.

 

असा केला खून

 

३० ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वा सुमारास महिला या घरामध्ये एकटया असल्याची खात्री त्या दोघांनी केली. त्यानंतर घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी महिला या टीव्ही पाहत होती.
त्यांच्यासोबत आरोपी देखील टीव्ही पाहू लागले. महिलेचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलुन देवुन त्याचे तोंड व नाक दाबुन खुन केला.
त्यानंतर कपाटातील 93 हजार रुपये रोख रक्कम व 67 हजार 500 रुपये रकमेचे सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता.
हा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहुन आपल्या हाताचे ठसे कोठे उमटु नये याकरीता हॅण्डग्लोजचा (handgloves) वापर केला होता.
आरोपींनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उप-आयुक्त परीमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (Chetan Thorbole), पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal), पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी,
सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, देवा चव्हान, सुहास मोरे, इंद्रजित जगताप, अमोल पाटील, सागर भोसले, विकास बादंल विकास पांडोळे,
अमित बोडरे यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे हे करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder of 70 year old woman by 2 minors after watching CID series! ‘Exposed’ by Sinhagad Road Police, Find out the full story

 

हे देखील वाचा :

IBPS Recruitment 2021 | ‘या’ 11 सरकारी बँकांमध्ये निघाली 1828 पदांसाठी SOची बंपर व्हॅकन्सी, इथं करा अप्लाय

Pune Crime | पुण्यात स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये मागणार्‍यावर खंडणीचा गुन्हा

Pune Crime | CCTV मध्ये कैद होवून दंड बसू नये म्हणून लढवलेली शक्कल आली अंगलट; प्रसाद कटारियाविरूध्द FIR दाखल

 

Related Posts