IMPIMP

Daund Murder Case | दौंड मधील 7 जणांच्या हत्याकांडाचे गुढ वाढलं, अंत्यविधी केलेले मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी बाहेर काढले

by nagesh
Daund Murder Case | pune daund massacre police exhumed three dead bodies out of seven for postmortem

दौंड/पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Daund Murder Case | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या (Yavat Police Station) हद्दीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात (Bhima River) आढळून आले होते. पोलीस तपासात ही आत्महत्या (Suicide) नसून खून असल्याचे समोर आले. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या हत्याकांडाच्या प्रकरणाचे (Daund Murder Case) गुढ अधिक वाढत आहे. या सातपैकी अंत्यविधि केलेले तीन मृतदेह शवविच्छेनसाठी पुन्हा बाहेर काढण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दौंड येथे घडलेल्या हत्याकांडाच्या प्रकरणाच्या (Daund Murder Case) पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे हत्याकांडाचे रहस्य वाढत आहे. ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) एक पथक शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात (Yawat Rural Hospital) दाखल झाले आहे. शवविच्छेदनासाठी (Postmortem) उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (Sub Divisional Police Officer Rahul Dhas), तहसीलदार संजय पाटील (Tehsildar Sanjay Patil), यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) हे उपस्थित राहणार असून त्यांच्या समोर पुन्हा शवविच्छेदन केले जाणार आहे.

 

मंगळवारी (दि.24) एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. कौटुंबिक वादातून हत्या केली आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सातही जणांचे मृतदेह यवतमध्ये पुरण्यात आले होते. त्यानंतर पोलीस बाकी तपास करत होते. परंतु पोलिसांनी त्यांचा सखोल तपास सुरु ठेवा आहे, त्यासाठी तीन जणांचे पूरलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढले आहेत. याच सात मृतदेहापैकी तीन मृतदेहाचे शवविच्छेदन गुरुवारी (दि.26) केले जाणार आहे. यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाच जणांना अटक
मोहन उत्तम पवार (वय 45). संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय- 40 दोघे रा. खामगांव ता. गेवराई जि. बीड), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय-28) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-24) त्यांचा मुलगा रितेश उर्फ भैय्या शामराव फुलवरे (वय-7), छोटू फुलवरे (वय-5), कृष्णा (वय-3 सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक कल्याण पवार (वय-39), शाम कल्याण पवार (वय-35), शंकर कल्याण पवार (वय-37), प्रकाश कल्याण पवार (वय-24), कांताबाई सर्जेराव जाधव (वय-45 सर्व रा. ढवळेमळा निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. (Pune Crime News)

 

सूडाच्या भावनेतून कृत्य
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये, मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यापूर्वी अनिल पवार आणि
त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा येथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता.
धनंजय हा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्याच्या मुलाने ही बाब सांगितली नाही.
चार दिवसांनी धनंजयचा अपघात झाल्याची माहिती चुलत भावांना समजली. त्यानंतर धनंजय पवार यांचा मृत्यू झाला.
धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता.
त्याचा राग मनात धरुन हे हत्याकांड करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Daund Murder Case | pune daund massacre police exhumed three dead bodies out of seven for postmortem

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…

Pune Crime News | डंझोमध्ये नोकरी लावतो म्हणून सांगितलं, डिलिव्हर करायचे असल्याचे सांगून महिलेला बोलावून घेतले अन् त्यानंतर…, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

 

Related Posts