IMPIMP

Maharashtra Politics | नाशिकमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; मंत्री दादा भुसेंनी दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा, म्हणाले…

by nagesh
Maharashtra Politics | shinde camp leader dada bhuse pinches dr advay hiray who left bjp to join shivsena uddhav balasaheb thackeray

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत असतानाच ठाकरे गटासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे (Advay Hire) हे ठाकरे गटामध्ये सामिल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे ते वारसदार आहेत. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर बोलताना शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले की, ‘लोकशाहीत कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. तसेच, गेल्या घरात त्यांनी सुखात रहावे, ज्या ठिकाणचे कुंकु लावले त्या ठिकाणी त्यांनी सुखाने नांदावे.’ असा खोचक टोला यावेळी बोलताना दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांना लगावला.

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे हे शिंदे गटासोबत गेले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपची युती झाली. या राजकीय घडामोडीनंतर दादा भुसे यांच्याविरोधात जोरदार फटकेबाजी करणाऱ्या अद्वय हिरे यांची कोंडी झाली होती. त्यानंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला जवळ केल्याचे समजते. (Maharashtra Politics)

 

नाशिकमध्ये एका बाजूला एकापाठोपाठ एक शिवसैनिक ठाकरे गटाला रामराम ठोकत असतानाच शिंदे गटात मात्र जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाला भाजपच्या नाशिकमधील नेत्याला वळविण्यात यश आले आहे. भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ. अद्वय हिरे हे भाजपला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्के बसल्यानंतर आता भाजपला मालेगावमध्ये धक्का बसणार आहे.
तर अद्वय हिरे आणि दादा भुसे यांचा सामना आता नाशिकमध्ये पहायला मिळणार आहे.

 

दरम्यान, नुकतच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar)
यांचा पहाटेचा शपथविधी म्हणजे शरद पवार यांची खेळी असू शकते.
असे विधान केले होते. त्यावर बोलताना दादा भुसे म्हणाले की, ‘असं असेल तर मग इतके वर्ष जयंत पाटील गप्प का
बसले? तीन वर्षे पोटात ठेवलेले आता ओठावर कसे आले?’ असा सवाल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जयंत पाटील यांना विचारला.

 

तसेच, यावेळी बोलताना दादा भुसे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर सांगितले की, ‘बजेट अगोदर प्रत्येक जिल्ह्याचे आर्थिक नियोजन केले जाते.
संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतरच राज्याचे बजेट सादर केले जाते. त्याच संदर्भात आज नियोजनाची बैठक झाली आहे.
लवकरच वित्तमंत्री या संदर्भात आढावा घेणार आहेत.’ अशी माहिती देखील यावेळी बोलताना दादा भुसे यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde camp leader dada bhuse pinches dr advay hiray who left bjp to join shivsena uddhav balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | डंझोमध्ये नोकरी लावतो म्हणून सांगितलं, डिलिव्हर करायचे असल्याचे सांगून महिलेला बोलावून घेतले अन् त्यानंतर…, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Parbhani Accident | झेंडावंदनला जाताना रील बनवणं बेतलं जीवावर, भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

Maharashtra Politics | आनंद मठात न जाता उद्धव ठाकरे मुंबईला परतले, शिंदे गटातील नेत्याची टीका; म्हणाले…

 

Related Posts