IMPIMP

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द

by nagesh
Deccan Queen Express | deccan queen express cancelled for 4 days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई विभागामध्ये (Mumbai Division) 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान (Thane To Diva Station) पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम केले जाणार आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे पुणे स्थानकावरून (Pune Railway Station) धावणाऱ्या डेक्कन (Deccan), डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express) 4 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईतील 72 तासांच्या ब्लॉकमुळे मुंबईला येणाऱ्या साधारण पन्नास गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पुणे स्थानकावरून धावणाऱ्या डेक्कन (Deccan), डेक्कन क्वीन एक्सप्रेस 4 दिवसाकरिता रद्द करण्यात आलीय. त्याचबरोबर पुण्याहून धावणारी कोयना एक्सप्रेसही (Koyna Express) रद्द करण्यात आली आहे.

 

दरम्यान, 4 ते 7 फेब्रुवारी कालावधीत पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस (Pune-Mumbai Deccan Express) रद्द झाली तर 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस (Mumbai-Pune Deccan Express) धावणार नाही. तसेच, 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द झालीय. त्याचबरोबर 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस (Hyderabad-Mumbai Express) ही पुण्यापर्यंतच धावणार आहे तर हुसेनसागर एक्सप्रेसही (Hussainsagar Express) पुण्यापर्यंत धावेल.

 

Web Title :- Deccan Queen Express | deccan queen express cancelled for 4 days

 

हे देखील वाचा :

Asaduddin Owaisi | ‘मेरठ येथून परत येताना गाडीवर गोळीबार, 4 राऊंड केले फायर’ – असदुद्दीन ओवेसींचा दावा

Pune News | बहिणीने वाचवला भावाचा जीव ! स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4136 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Currency | तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी की बनावट, अशी ओळखा

 

Related Posts